AAI Recruitment 2025 Saam Tv
बिझनेस

AAI Recruitment: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी अन् १.१० लाख रुपये पगार; या पदांसाठी भरती सुरु; वाचा सविस्तर

Airport Authority of India Recruitment: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ज्युनिअर असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एअरपोर्टवर नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये सध्या नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुमचे शिक्षण पूर्ण झाले असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही उत्तम संधी आहे.

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये सिनियर असिस्टंट आणि ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १२ डिसेंबरपासून अधिकृत वेबसाइटवर अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत.

या नोकरीसाठी तुम्ही www.aai.aero या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. नॉर्थ ईस्टर्न रीजनमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह कॅडरसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १८ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

पात्रता

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन / रेडिओ इंजिनियरिंगमध्ये २ वर्ष काम केलेले असावे. ज्युनिअर असिस्टंट (एचआर) पदासाठी ग्रॅज्युएशन केलेले असावे.ज्युनिअर असिस्टंट (फायर सर्व्हिसेस) पदासाठी १० वी पास असावे त्याचसोबत ३ वर्षांचा ऑटोमोबाईल / फायर रेग्युलर डिप्लोमा केलेला असावा.

एअरपोर्ट ऑथोरिटीमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीद्वारे होणार आहे. ज्युनिअस असिस्टंट पदासाठी कॉम्प्युटर लिट्रसी टेस्ट घेतली जाणार आहे. सिनियर असिस्टंट पदासाठी ३६,००० ते १,१०,००० रुपये पगार मिळणार आहे तर ज्युनिअर असिस्टंट पदासाठी ३१००० ते ९२००० रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला www.aai.aero वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला साइन इन करायचे आहे. त्यानंतर तुमची सर्व माहिती भरायची आहे.

यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचे आहे.

यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्यामध्ये तुमची माहिती, शैक्षणिक माहिती भरायची आहे.

यानंतर तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायची आहे. यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Street style pav bhaji recipe: घरच्या घरी कशी बनवाल स्ट्रीट स्टाईल पाव भाजी? पाहा सोपी रेसिपी

Video: 'सह्याद्री'ही हेलावला, अलोट गर्दीने फोडला हंबरडा! शरद पवारांनी दिला अजित पवारांना अखेरचा निरोप

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Face Care: पिंपल्स, पोअर्स कायमचे दूर होतील; महागड्या ट्रिटमेंटपेक्षा वापरा 'हा' होममेड फेसपॅक

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : कामाचा माणूस हरपला! अजित पवारांना पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT