Free Aadhar Update Saam Tv
बिझनेस

Aadhar Update: आताच हे काम करा अन्यथा आधार कार्ड होणार बंद, सरकारी नियम काय सांगतो

Aadhar Update Rule: आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. दरम्यान, ७ वर्षांच्या मुलांना आधार अपडेट करणे अनिवार्य आहे. जर तुम्हे हे असं केलं नाही तर तुमचं आधार कार्ड बंद होणार आहे.

Siddhi Hande

आधार अपडेटचे नियम

७ वर्षांच्या मुलांचे आधार अपडेट करणे अनिवार्य

UIDAIने दिल्या सूचना

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. दरम्यान,आता लहान मुलांच्या आधार कार्डबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. UIDAI म्हणजे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने याबाबत सूचना दिल्या आहेत. जर कोणत्या मुलाचे ५ वर्षाआधी आधार कार्ड बनले असेल आणि ७ वर्षापर्यंत त्यांनी बायोमॅट्रिक पद्धतीने अपडेट केले नाही तर ते आधार कार्ड बंद होऊ शकते.

आधार कार्ड अपडेट (Aadhar Card Update)

लहान मुलांचे फक्त नाव, जन्मतारीख, पत्ता आणि फोटो याच्या आधारे आधार कार्ड बनवले जाते. लहान मुलांची बायोमॅट्रिक केली जात नाही. त्यांचे फिंगरप्रिंट आण आईरिस विकसित झालेले नसतात. त्यामुळे बायोमॅट्रिक केले जात नाही. यामुळे ५ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचे आधार अपडेट करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही मुलांचे आधार कार्ड योग्य वेळी अपडेट केले नाही तर तुम्हाला शाळेचे अॅडमिशन, परीक्षा आणि स्कॉलरशिपसाठी अडचणी येऊ शकतात.

१७ कोटी मुलांचे आधार अपडेट बाकी

UIDAI नुसार, जवळपास १७ कोटी लहान मुलांचे आधार अपडेट होणेर बाकी आहे. दरम्यान, यासाठी UIDAIने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. शाळांमध्ये आधार अपडेट कॅम्प सुरु केले जातील. यामुळे UDISE+ प्लॅटफॉर्मवर मुलांची लिस्ट तयार केली जाईल आणि त्यांच्या आईवडिलांना मेसेज दिला जाईल.

कधी आणि कसं करता येणार मोफत अपडेट?

लहान मुलांसाठी ५ ते ७ वर्षांच्या मुलांना बायोमॅट्रिक करणे मोफत आहे. जर आईवडिलांनी या काळात आधार अपडेट केले तर त्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. परंतु ७ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मुलांचे आधार अपडेट करायचे असेल तर १०० रुपये शुल्क द्यावे लागेल. जर मुलांच्या शाळेत आधार अपडेट होत नसेल तर जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन तुम्हाला आधार अपडेट करावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : हिट अँड रनचा थरार! भरधाव कारने बहिणींना चिरडले; थोरलीचा मृत्यू, धाकटी गंभीर जखमी

CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सीडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड

Mahesh Manjrekar: आज शिवाजी महाराज असते तर...; महेश मांजरेकरांसह 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचे कलाकार साई चरणी नतमस्तक

Surya Gochar Luck: सूर्य तूळ राशीत करणार मार्गक्रमण, मिथुन, सिंहसह आणखी एक रास होणार मालामाल

Jalgaon : धरणात पोहण्यासाठी उतरणे जीवावर बेतले; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT