Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची दिवाळी काही राशीसाठी अत्यंत खास असणार आहे. सूर्याचे प्रत्येक राशीत परिवर्तन होते ज्याचा परिणाम १२ राशींवर होतो.
पंचागांनुसार, सूर्य १७ ऑक्टोबरला म्हणजेच धनत्रयोदशीच्या पूर्वी कन्या राशीतून तूळ राशीत मार्गक्रमण करणार आहे.
सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींवर विशिष्ट परिणाम पाहायला मिळणार आहे.
मिथुन राशीसाठी सूर्याचे परिवर्तन लाभदायी असणार आहे. या राशींना कामाची चांगली संधी मिळणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह असून त्याचा परिणाम उत्तम असेल. या काळात व्यक्तीला धनलाभाची शक्यता आहे.
धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन शुभदायी असेल ज्यामुळे धनु राशीच्या संपत्तीत वाढ होणार आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.