Manasvi Choudhary
अवघ्या काही दिवसात दिवाळी सणाला सुरूवात होणार आहे. १८ ऑक्टोबरपासून दिवाळी सण सर्वत्र साजरा होणार आहे.
दिवाळीनिमित्त घरोघरी फराळ बनवला जातो. दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या पदार्थांना फराळ म्हणतात.
मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का? दिवाळीच्या पदार्थांना फराळ का म्हणतात.
संस्कृत शब्द फलहार या शब्दावरून फराळ असा शब्द उच्चारला गेला असं मानलं जाते. फलहार म्हणजेच उपवासाच्या दिवशी जो फळांचा आहार केला जातो तो होय.
दिवाळीत अनेकजण उपवास करतात यावेळी दिवाळीचा फलहार करतात यामुळे फराळ हा शब्द पुढे रूढ झाला असावा.
दिवाळीत नातेवाईक, मित्रमंडळी फराळ करायला बोलवतात. दिवाळीला हा खास विविध पदार्थांचा फराळ केला जातो.
चकली, चिवडा,लाडू, करंजी, शंकरपाळी हा दिवाळीचा मुख्य फराळ आहे.दिवाळीच्या फराळ बनवल्याने दिवाळीचा उत्साह आणखी वाढतो आनंद येतो.