CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सिडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड

CIDCO Lottery: सिडकोच्या लॉटरीबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ३५ लाखांमध्ये तयार होणारं घड सिडकोकडून ७५ लाखांना विकले जात असल्याची माहिती आरटीआयमधून उघड झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सिडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड
CIDCO LotterySaam Tv News
Published On

Summary -

  • सिडकोच्या घरांच्या किंमतींवरून आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर आली

  • ३५ लाखांना तयार झालेले घर नागरिकांना ७५ लाखांपर्यंत विकले जाते

  • नागरिकांनी सिडकोकडे १८ हजार घरं परत केली

  • सिडकोकडून किंमती कमी करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईतील वाशी आणि खारघर परिसरात सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील घरांच्या अवाच्या सवा किंमतींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सिडकोच्या घरांच्या किंमतीबाबत आरटीआयमधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 'जे घर ३५ लाखाला तयार होते ते घर हे ७४ लाख १० हजाराला विकतात,' असा आरोप करण्यात आला आहे. ही धक्कादायक बाब माहिती अधिकारातून समोर आल्याचे सांगितले जात आहे.

CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सिडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड
CIDCO Lottery: घराचे स्वप्न पूर्ण होणार! सिडकोची २२ हजार घरांसाठी लॉटरी; वाचा सविस्तर

विशेष म्हणजे, आमदार, खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांसाठी उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातील घरांच्या किंमती सर्वसामान्यांसाठीच्या घरांपेक्षा कमी असल्याचीही माहिती समोर आली आहे. परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली सिडको १०० ते १२० टक्के नफा कमवत असल्याचा आरोप होत आहे. अनेक नागरिकांनी या महागड्या घरांकडे पाठ फिरवली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सिडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड
Cidco Lottery: सिडकोकडून खुशखबर! घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; शेवटची तारीख काय? वाचा

तसेच सिडकोने अजूनपर्यंत घराच्या किमती कमी होण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे अनेकांनी १८ हजार पेक्षा अधिक घर सिडकोकडे परत केली आहेत. त्यामुळे सिडकोचं घर ७५ लाखांपासून ते ९६ लाखांपर्यंत असल्यामुळे सर्वसामान्यांनी घरं कशी घ्यायची? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे माहितीच्या अधिकारात हे घर ३५ लाखांमध्ये मिळत असून त्याची किंमत ७५ लाखांपर्यंत सिडकोने केली आहे.

CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सिडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड
CIDCO Lottery 2025: घराचं स्वप्न होईल पूर्ण; नवी मुंबईत सिडकोकडून २२००० घरांची जम्बो लॉटरी

सिडकोच्या माध्यमातून स्वस्त घरं मिळत असल्यामुळे आपल्या हक्काचे घर खरेदी करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. सिडकोच्या घरांची लॉटरी निघाली की मोठ्या प्रमाणात अर्ज केले जातात. पण सिडकोच्या घरांच्या किंमती वाढल्यामुळे नागरिकांचा घर खरेदीकडे कल कमी झाला आहे. घरांच्या किंमती कमी करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पण अद्याप सिडकोकडून याबाबत काहीच निर्णय घेण्यात आला नाही.

CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सिडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड
Diwali CIDCO Lottery 2025 : दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर, जाणून घ्या कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com