Jalgaon : धरणात पोहण्यासाठी उतरणे जीवावर बेतले; तरुणाचा बुडून मृत्यू

Jalgaon News : जळगाव तालुक्यात बुडून मृत्यू झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घडल्या असून यात धरणात बुडून तरुणाचा मृत्यू झाला तर काम आटोपून सायंकाळी गिरणा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या मजुराचा देखील मृत्यू झाला
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : गावापासून जवळच असलेल्या धरणाच्या पाण्यात तिघेजण पोहण्यासाठी गेले होते. धरणात उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तरुण बेपत्ता झाला. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील नेव्हरे धरणात सदरची घटना घडली आहे. तर लमांजन येथील गिरणा नदीत एका प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली आहे. 

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील शरद राजाराम सुने असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे. दरम्यान शरद हा बुधवारी सकाळी सातच्या सुमारास भिका वसंत शिंपी (वय ४५) आणि अशोक सखाराम भिल (वय ५०) यांच्यासोबत नेव्हरे धरणावर पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडून बेपत्ता झाला. त्याला दोघांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही वेळातच बेपत्ता झाला होता. 

Jalgaon News
Fake Notes : बनावट नोटा प्रकरणी आणखी एकास अटक; कोल्हापूरमधून आणखी साडेसहा लाखांच्या बनावट नोटा जप्त

ग्रामस्थांनी काढला मृतदेह 

सोबत असलेल्या दोघांनी गावात जात घडलेला प्रकार सांगितला. ग्रामस्थांनी नेव्हरे धरणाकडे धाव घेतली. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी तासभर शोध घेत खोल तळातून बुडालेल्या शरदला बाहेर काढले. मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. शरद आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता.

Jalgaon News
Lightning Strike : चिपळूणमध्ये परतीच्या पावसाचे थैमान; वीज पडून तरुणाचा मृत्यू, ६ जण जखमी

मजुराचा गिरणा नदीत बुडून मृत्यू
दुसऱ्या घटनेत जळगाव तालुक्यातील लमांजन येथील एका मजुराचा गिरणा नदीवर आंघोळीसाठी गेला असता पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. जयसिंग सुभाष बारेला (वय ४०) असे मृताचे नाव आहे. बारेला कुटुंब लमांजन येथे शेतमजुरीसाठी सालदार म्हणून राहतात. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास बारेला नदीकाठावर आंघोळीसाठी गेला होता. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. दरम्यान, नदी परिसरात वृद्ध आई आणि बहिणीने पाहणी केली असता, नदीच्या किनाऱ्यावर जयसिंग यांचे कपडे, मोबाईल ठेवल्याचे आढळून आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह आढळून आला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com