Fake Notes : बनावट नोटा प्रकरणी आणखी एकास अटक; कोल्हापूरमधून आणखी साडेसहा लाखांच्या बनावट नोटा जप्त

Sangli News : बनावट छपाईचे साहित्य जप्त करत पुणे-बंगळुरू महामार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या ९९ लाख २३ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत बनावट नोटांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता.
Fake Notes
Fake NotesSaam tv
Published On

सांगली : सांगली जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आणल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली होती. या बनावट नोटा प्रकरणी सांगलीच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांनी आणखी साडेसहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करत एकास अटक केली आहे. यामुळे बनावट नोटा चलनात आणल्या जाणाऱ्यांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांकडून कोल्हापुर येथे छापा टाकून बनावट छपाईचे साहित्य जप्त करत पुणे-बंगळुरू महामार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या ९९ लाख २३ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत बनावट नोटांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता. आता या बनावट नोटांच्या रॅकेटची व्याप्ती आणखी वाढत असल्याचे आजच्या कारवाईवरून समोर आलं आहे.

Fake Notes
Malegaon : मालेगावात एमडी ड्रग्स तस्करी उघड; किल्ला पोलिसांनी कारवाई करत तिघांना घेतले ताब्यात

पाचशेच्या १३०० बनावट नोटा जप्त 

दरम्यान सांगलीच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांनी कोल्हापूरच्या गांधीनगर येथे छापा टाकत पाचशे रुपयांच्या १ हजार ३०० बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्याच बरोबर अर्धवट बनवलेल्या नोटा कागदांचा बंडल आणि प्रिंटीगचे वेस्टेज साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात अभिजीत पोवार यास अटक करण्यात आले असून बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता सहा झाली आहे.

Fake Notes
Gadchiroli : अवैध रेती उत्खनन; मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारावर कारवाईची शिफारस

अमरावती बाजारपेठेत २६ हजार 500 रुपयांच्या नकली नोटा जप्त

अमरावती : अमरावतीत दिवाळीच्या तोंडावर नकली नोटा बाजारात चलनात आल्या आहेत. नांदगाव पेठ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तिघाना रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल २६ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. आणखी एक आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे. रहाटगाव मधून तिघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी आरोपीची अंगझडती घेतल्यावर  ५०० रुपयांच्या बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com