Aadhaar App: आधार कार्डची गरजच नाही! QR कोड स्कॅन करा अन् सर्व माहिती मिळवा; नवीन आधार अ‍ॅप लाँच

New Aadhaar App Launch: सर्वसामान्यांसाठी महतत्वाची बातमी आहे. आता तुम्हाला कुठेही आधार कार्ड घेऊन जायची गरज भासणार नाही. सरकारने नवीन आधार अॅप लाँच केले आहे.
Aadhaar App
Aadhaar AppSaam Tv
Published On

प्रत्येक भारतीयांसाठी आधार कार्ड ही महत्त्वाची ओळख आहे. शाळेत अॅडमिशन घेण्यापासून ते सरकारी कामांसाठी आधार कार्डची गरज असते. देशातील ९० टक्के लोकांकडे आधारकार्ड आहे. परंतु प्रत्येक कामासाठी आधार कार्डची हार्ड कॉपी घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक अडचणी येतात. कधीकधी आधार कार्ड हरवण्याचीदेखील शक्यता असते. त्यामुळेच आता नवीन आधार अॅप लाँच केले आहे.

आता तुम्ही या आधार अॅपच्या मदतीने क्यूआर कोड स्कॅन करुन सर्व कामे चुटकीसरशी करु शकतात. तुम्हाला हार्ड कॉपी ठेवण्याची गरजच भासणार आहे. हे नवीन आधार अॅप आहे तरी काय? जाणून घ्या

Aadhaar App
New Pension Scheme: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना; पुढच्या महिन्यापासून होणार सुरू, काय मिळतील लाभ?

क्यूआर कोड स्कॅनने होणार सर्व कामे

सध्या तुम्हाला प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड सोबत न्यावे लागते. परंतु आता आधार अॅपमध्ये फक्त क्यूआर कोड स्कॅन करुन तुम्ही स्वतः ची ओळख पटवू शकतात.आता तुम्हाला आधार अॅप डाउनलोड करुन क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुमची सर्व माहिती समोर स्क्रिनवर दिसणार आहे. यामध्ये तुमचे डिजिटल आधार कार्डदेखील दसणार आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, आता या नवीन अॅपमुळे तुम्हाला तुमचे आधार कार्ड सोबत ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला त्याचा फोटोदेखील ठेवणे गरजेचे नाही.आता व्हेरिफिकेशन खूप सोपे होणार आहे. आधार अॅपमध्ये जाऊन फेस आयडी ऑथेंटिकेशन करुन तुम्ही तुमची ओळख पटवू शकतात.

Aadhaar App
Aadhaar linking: फक्त 5 स्टेप्स! घरबसल्या आधार आणि Voter ID करा लिंक

ज्याप्रकारे यूपीआय अॅप काम करते त्याचप्रकारे तुम्हाला आधार अॅपमध्ये जाऊन क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे. याचपद्धतीने तुम्ही तुमची माहिती दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतात.यामध्ये तुम्हाला जेवढी माहिती शेअर करायची आहे तेवढीच करु शकतात.

Aadhaar App
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, निवृत्तीनंतर दरमहा मिळतील २० हजार रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com