Aadhaar Card  Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card Update : आधार कार्ड अपडेट करायचं? घरबसल्या नाव, पत्ता अन् फोटो बदला, वाचा संपूर्ण प्रोसेस

Aadhaar Card Update Process: आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस आता आणखी सोपी होणार आहे. तुम्हाला डिजिटल ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करता येणार आहे.

Siddhi Hande

भारतात आधार कार्ड हे ओळखपत्र आहे. तुम्ही भारतीय रहिवासी असल्याचा एक प्रकारचा पुरावा आहे. आधार कार्डशिवाय अनेक कामे होत नाही. मुलांच्या जन्मापासून ते त्याच्या शिक्षणापर्यंत सर्व कामांसाठी आधार कार्ड गरजेचे आहे. दरम्यान, आधार कार्ड दर १० वर्षांनी अपडेट करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केले नाही तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात.

जर तुम्ही घर बदलले असेल तर आधार कार्डवरील पत्ता बदलायचा असतो. जर तुमचे लग्न झाले असेल तर नाव बदलायचे असते. ईमेल आणि जन्मतारीखमध्येही काही बदल असेल तर तो करायचा असतो. दरम्यान, आता यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता नोव्हेंबरपासून आधार कार्ड अपडेटची प्रोसेस आणखी सोपी होणार आहे.

आधार कार्ड डिजिटल अपडेटची प्रोसेस सोपी होणार आहे. यामुळे पेपरवर्क कमी होणार आहे. याचसोबत ऑथेंटिकेशन अजून जलद होणार आहे.

UIDAI ने पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि सरकारी नोंदी करण्यासाठी माहिती क्रॉस व्हेरिफाय करण्यासाठी आधार अपडेटची प्रोसेस आणखी सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्हाला कागदपत्रे सारखी अपलोड करण्याची गरज नाहीये. तुमची लाइट बिल हे पत्त्याचा पुरावा म्हणून स्विकारली जाणार आहेत. यामुळे आधार अपडेटची प्रोसेस सिंपल होणार आहे.

यूआयडीएआय लवकरच मोबाईल अॅप लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये तुम्हाला क्यूआर कोडद्वारे सर्व माहिती डिजिटल उपलब्ध होणार आहे. या नवीन अपडेटमुळे तुम्हाला ऑफलाइन फोटोकॉपीची आवश्यकता लागणार आहे. तुम्ही आता डिजिटल आधार कार्ड किंवा त्याची मास्क कॉपी शेअर करु शकतात. यामुळे फ्रॉड होणार नाहीत.

जर तुम्हाला तुमचा पत्ता बदलायचा असेल तर तुम्ही मोफत बदलू शकतात. तुम्हाला myAadhaar अॅपवर जाऊन १४ जूनपर्यंत मोफत पत्ता बदलण्याची सुविधा मिळणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

SCROLL FOR NEXT