Aadhar Card Update Charges : आधार कार्ड अपडेटसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार, आता शुल्क किती रुपयांनी वाढलं?

Aadhar Card Update : आधार कार्ड अपडेटसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. ही शुल्कवाढ ठराविक कालावधीसाठी लागू राहील.
Aadhar Card Update service
Aadhar Card Update saam tv
Published On

आधार कार्ड अपडेट करणं महागलं आहे. भारतातील आधार कार्ड अपडेटच्या शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२८ पर्यंत ही नवी शुल्कवाढ लागू राहील. त्यानंतर नवीन रेट चार्ट हा १ ऑक्टोबर २०२८ ते ३० सप्टेंबर २०३१ पर्यंत लागू राहील.

UIDAI म्हणजे आधार कार्डासाठी ५० रुपये ते १०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जायचे. त्यानंतर शुल्कवाढ ७५ रुपये ते १२५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नवी शुल्कवाढ २०२८ पर्यंत लागू राहील.

कोणकोणत्या सेवा महागणार?

५० रुपयांमध्ये मिळणाऱ्या सेवांचे दर आता ७५ रुपये इतके करण्यात आले आहेत. यात नाव, पत्ता,मोबाईल क्रमांक, जन्मतारीख या सेवांचा समावेश आहे. बायोमेट्रिक अपडेटची किंमत आधी १०० रुपये होती. आता त्या सेवेचं शुल्क १२५ रुपये इतकं करण्यात आलं आहे. ही शुल्कवाढ २०२५ ते २०२८ पर्यंत लागू राहील. परंतु २०२८ सालानंतर सेवाशुल्कात आणखी वाढ होईल.

Aadhar Card Update service
Maharashtra Politics : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पोसलेली कुत्री; कुणी केली जहरी टीका?

UIDAIने काही वयोगटासाठी शुल्कात सवलत दिली आहे. ५ ते ७ आणि १५ ते १७ वयोगटातील लहान मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट पहिल्यांदा मोफत असेल. तसेच ७ ते १५ वयोगटातील मुलांसाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बायोमेट्रिक अपडेट शुल्क माफ करण्यात आलं आहेत. या वयोगटाच्या व्यतिरिक्त बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी १२५ रुपये शुल्क (२०२५-२०२८) आकारले जाईल. तर पुढील कालावधित १५० रुपये शुल्क (२०२५ ते २०३१) आकारले जाईल.

Aadhar Card Update service
Pune Andekar Gang : आंदेकर टोळीचे पाय आणखी खोलात; व्यावसायिकाकडून उकळली ५.४ कोटींची खंडणी

कलर प्रिंट आणि ई-केवायसीमध्ये शुल्कवाढ

आधार कार्डाची कलर प्रिंट आणि ekyc हवी असेल, तर त्यासाठीही पैसे मोजावे लागतील. आता या सेवेसाठी ४० रुपये (२०२५ ते २०२८) आणि ५० रुपये (२०२८-२०३१) इतके शुल्क आकारले जातील.

तुम्हाला घरबसल्या आधार कार्ड अपडेट करायचं असेल, तर घरातील एका व्यक्तीला सेवेसाठी ७०० रुपये (With GST) मोजावे लागतील. एकाच कुटुंबातील इतर सदस्याला अतिरिक्त सेवेसाठी ३५० रुपये शुल्क आकारले जाईल.

तुम्ही ७ ते १५ वयोगटातील असाल, तर ३० सप्टेंबर २०२६ आधी तुम्हाला बायोमेट्रिक अपडेटसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. तर डॉक्युमेंट अपडेट ऑनलाइनसाठी ही मुदत १४ जून २०२६ ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com