Aadhaar Card Fraud Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card Misuse: तुमच्या आधार कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? कसं आणि कुठे कराल तपास?

Aadhaar Card Fraud : जर तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये तुम्ही घेतलेले कर्ज दिसत असेल, तर विलंब न करता तक्रार दाखल करा. यासाठी तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता.

Bharat Jadhav

आधार कार्ड आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे, त्याशिवाय जवळजवळ प्रत्येक महत्त्वाचे काम अपूर्ण आहे. बँक खाते उघडणे असो, सरकारी योजनांचा लाभ घेणे असो किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे काम असो, आधार कार्ड सर्वत्र आवश्यक आहे. पण तुम्हाला माहितीये, तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होण्याचा देखील धोका वाढलाय. अनेकवेळा, फसवणूक करणारे तुमच्या आधार कार्डचा वापर करून तुमच्या नावावर बनावट कर्ज घेतात. त्याचा फटका तुम्हाला सहन करावा लागतो.

जर तुम्हालाही शंका असेल की तुमच्या आधार कार्डवर कोणी तरी कर्ज घेतलंय. तर त्याचा तपास तुम्ही घरी बसून करू शकतात. तुमच्या नावावर कर्ज आहे की नाही हे तुमच्या सिबिल स्कोअर, पॅन कार्ड, आधार क्रमांक आणि बँक स्टेटमेंटच्या मदतीने कसे शोधायचे ते जाणून घेऊ.

CIBIL स्कोअर वापरून तुमचे कर्ज तपासा

सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासणे. हा क्रेडिट रिपोर्ट तुमच्या आर्थिक आरोग्याची संपूर्ण नोंद ठेवतो. तुम्ही CIBIL, Experian किंवा Equifax सारख्या क्रेडिट रेटिंग एजन्सींच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुमचा क्रेडिट रिपोर्ट मोफत डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला CIBIL च्या www.cibil.com या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर, आधार नंबर आणि काही मूलभूत माहिती तिथे टाकावी लागेल.

तुमचा क्रेडिट रिपोर्ट दिसताच, तुमच्या नावावर नोंदणीकृत सर्व कर्जे आणि क्रेडिट कार्डची माहिती त्यात दिसेल. जर त्यात तुम्हाला असे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड दिसले ज्याबद्दल तुम्हाला कोणतीही माहिती नाही, तर समजून घ्या की काहीतरी चूक आहे. त्यावर लगेच त्वरित कारवाई करा.

आधार कार्डद्वारे कर्जाची स्थिती जाणून घ्या

अनेक बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आधार कार्डद्वारे कर्जाची माहिती देतात. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपला भेट द्यावी लागेल. तिथे लॉगिन करा आणि तुमच्या आधार क्रमांकासह ओटीपी पडताळणी पूर्ण करा. काही मिनिटांतच, तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक केलेल्या कर्जाची संपूर्ण माहिती मिळेल. जर तुमची बँक ही सुविधा देत असेल, तर ही पद्धत खूप सोपी आहे.

तुम्हाला बनावट कर्ज दिसले तर तक्रार करा

जर तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये तुम्ही न घेतलेले कर्ज दिसत असेल, तर विलंब न करता तक्रार दाखल करा. जर तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये तुम्ही कर्ज घेतलं नाही तरी त्यात दाखवत असेल तर विलंब न करता तक्रार दाखल करा. यासाठी तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत पोर्टल https://sachet.rbi.org.in वर जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमधील सायबर क्राइम सेलकडे देखील याबद्दल तक्रार करू शकतात.

आधार कार्डच्या सुरक्षिततेसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचे आहे. तुमचा आधार क्रमांक कोणासोबतही शेअर करू नका. जर तुम्हाला ओटीपी पडताळणीसाठी आधार क्रमांक टाकायचा असेल, तर तुम्ही ते फक्त विश्वसनीय वेबसाइट किंवा अॅप आहे, याची खात्री करा. तसेच, तुमचा क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी तपासत राहा जेणेकरून काही समस्या असल्यास तुम्हाला त्याबद्दल लगेच माहिती मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 फॉर्मेटचा नवा राजा! 3000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला; सूर्यकुमार फटकेबाजीचा बादशहा बनला

Iran Blast: इराणमध्ये मोठा स्फोट; ८ मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली, संपूर्ण देशात खळबळ

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, ही माझी इच्छा, विलीनीकरणावर पवारांचं विधान, राष्ट्रवादी विलिनीकरणात तटकरे, पटेलांचा खोडा?

IND vs NZ T20: वनडेचा स्कोअर टी २० सामन्यात; न्यूझीलंडची कडक धुलाई, भारताच्या धुरंधरांनी पराभवाचा वचपा काढला

SCROLL FOR NEXT