PM Kaushal Vikas Yojana Registration: आर्थिक मदत आणि स्वरोजगाराची संधी देणारी योजना; कशी कराल नावाची नोंदणी, जाणून घ्या अटी आणि पात्रता

PM Kaushal Vikas Yojana : या योजनेत तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षासाठी प्रशिक्षण दिलं जातं. या कालावधी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते.
PM Kaushal Vikas Yojana Registration
PRIME MINISTER’S SKILL DEVELOPMENT SCHEME TO EMPOWER YOUTH AND FIGHT UNEMPLOYMENT
Published On

देशातील बहुतेक मुलांसमोर बेरोजगारीची समस्या आहे. बेरोजगार राहण्याचं एक कारण म्हणजे ,पुरेसे शिक्षण न होणं. शिक्षण न झाल्याने रोजगार मिळत नाही. अनेकदा कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात. आता त्याच्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY). सुरू करण्यात आलीय. याला प्रधानमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम असेही म्हणतात.

भारत सरकारने जुलै २०१५ मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेत तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षासाठी नोंदणी केली जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जातं. हे प्रमाणपत्र संपूर्ण देशभर वैध असतं. या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी २४ लाख तरुणांना समाविष्ट केले जाणार आहे. अधिकाधिक लोक या योजनेत सामील व्हावेत, यासाठी तरुणांना कर्ज मिळण्याची सुविधा देखील आहे.

PM Kaushal Vikas Yojana Registration
Modi Government Decision: केंद्र सरकाराचा मोठा निर्णय! ELI योजनेला मंजुरी, नोकरीच्या विश्वात पहिल्यांदाच येणाऱ्यांना मिळणार मोठी भेट

या कामासाठी आणि लोकांना या योजनेशी जोडण्यासाठी, सरकारने अनेक दूरसंचार कंपन्यांना या कामासाठी स्वतःशी जोडण्यात आले आहे. या मोबाईल कंपन्या संदेशांद्वारे ही योजना सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. ही योजना केंद्र सरकारने सुरू केली असून देशातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि स्वरोजगाराची संधी देण्याचा उद्देश आहे. या योजनेतून अशा तरुणांना व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण दिलं जातं.

हे प्रमाणपत्र जे उमेदवार नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यासाठी उपयोगी पडते. अनेक तरुणांनी या योजनेचा फायदा घेऊन ट्रेनिंगनंतर नोकऱ्या मिळवल्या आहेत. तर काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.

योजनेचे फायदे PM Kaushal Vikas Yojana Benefits

निःशुल्क कौशल्य प्रशिक्षण, ३०० तासांचा कोर्स असतो.

प्रशिक्षण कालावधीत ८००० पर्यंत आर्थिक सहाय्य.

प्रमाणित सर्टिफिकेट नोकरी किंवा व्यवसायात उपयोगी पडते.

स्वरोजगार किंवा नोकरी मिळवण्याची संधी

PM Kaushal Vikas Yojana Registration
E shram Card: ई-श्रम कार्ड काढा आणि दरमहा 3000 रुपये मिळवा; जाणून घ्या पात्रता अर्ज प्रक्रिया

पात्रता काय आहे? PMKVY Eligibility

उमेदवार भारताचा नागरिक असावा

वय १५ ते ४५ वर्षांदरम्यान

शिक्षण: किमान १० वी पास (हिंदी आणि इंग्रजी भाषेचं मूलभूत ज्ञान)

बेरोजगार किंवा शिक्षण अर्धवट सोडलेलं असावं.

पूर्वीचं कौशल्य असेल, तरी नोंदणी करता येते.

PM Kaushal Vikas Yojana Registration
Government Scheme: महिलांसाठी सुवर्णसंधी; मोफत पीठ गिरणी योजना सुरू, असा करा अर्ज

कागदपत्रे

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र

वयाचा पुरावा

बँक खात्याचे तपशील

पासपोर्ट साईज फोटो

मोबाईल नंबर

अर्ज कसा करावा? PM Kaushal Vikas Yojana Online Registration

ऑफिशियल वेबसाइट: https://www.pmkvyofficial.org ला भेट द्या.

“Register as Candidate” हा पर्याय निवडा.

तुमचं नाव, पत्ता, DOB, शिक्षणाची माहिती त्यात भरा.

तुमच्या आवडीच्या कोर्सची निवड करा.

कागदपत्र अपलोड करा.

फॉर्म तपासून Submit करा.

यशस्वी नोंदणी झाल्यावर तुमचा ID प्रिंट करून घ्या.

निवड झाल्यावर तुम्हाला प्रशिक्षणासाठी कॉल येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com