Download Aadhaar card easily on WhatsApp using MyGov chatbot and OTP verification. 
बिझनेस

WhatsAppमध्ये आधार कार्ड डाउनलोड करण्याची सोपी ट्रिक

WhatsApp : तुम्ही तुमचे आधार कार्ड WhatsApp द्वारे सहजपणे डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला MyGov हेल्पडेस्क चॅटबॉटवर मेसेज करावा लागेल आणि OTP टाकावा लागेल.

Bharat Jadhav

  • WhatsApp द्वारे आधार कार्ड सहजपणे डाउनलोड करता येणार.

  • MyGov हेल्पडेस्क चॅटबॉटवर OTP वापरून Aadhaar मिळतो.

  • इंटरनेट आणि मोबाईल असल्यानं हार्ड कॉपीची गरज राहत नाही.

  • UIDAI कडून नागरिकांसाठी सोयीस्कर डिजिटल सेवा उपलब्ध.

आधार कार्ड सर्वात महत्वाचे सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. त्याची आवश्यकता अनेकदा असते. जर कोणी अचानक तुमचे आधार कार्ड मागितले आणि तुमच्या खिशात त्याची हार्ड कॉपी नसेल तर मोठी समस्या निर्माण होते. त्यासाठी आम्ही तुम्हाला एक अतिशय उपयुक्त जबरदस्त आयडिया सांगत आहोत. याद्वारे तुम्ही कधीही WhatsApp वर आधार कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकतात.

ही नवीन पद्धत सोपी आहे. युझर्सला डिजिलॉकरद्वारे चालणाऱ्या चॅटबॉटचा वापर करण्याचा पर्याय देते. डिजिलॉकर युझरला आधार कागदपत्रांच्या पीडीएफ डाउनलोड करण्याचा पर्याय देत असते. त्यामुळे कोणताही धोका नाही. तुम्हाला फक्त MyGOV हेल्पडेस्कच्या चॅटबॉटची मदत घ्यावी लागेल.

या चरणांचे अनुसरण करून डाउनलोड करा

सर्वप्रथम, तुमच्या फोनमध्ये MyGov Helpdek चा नंबर सेट करा. +९१-९०१३१५१५१५ ते सेव्ह करा.

यानंतर, तुम्हाला व्हाट्सअॅपवर जाऊन या नंबरवर 'हाय' किंवा 'नमस्ते' पाठवावे लागेल.

तुम्हाला वेगवेगळ्या सरकारी सेवांमध्ये प्रवेश करण्याचे पर्याय येथे दाखवले जातील.

येथे तुम्हाला 'डिजिटल आधार डाउनलोड' पर्यायावर टॅप करावे लागेल.

आता तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तो पडताळून पहावा लागेल.

तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला वन-टाइम-पासवर्ड (OTP) टाकावा लागेल आणि तो कन्फर्म करावा लागेल.

एकदा पडताळणी झाल्यानंतर आधार कार्ड थेट व्हॉट्सअॅपवर पीडीएफ स्वरूपात डाउनलोड केले जाईल.

तुम्ही ते एखाद्याला पाठवू शकता किंवा तुम्हाला हवे तेव्हा त्याची प्रिंटआउट घेऊ शकता.

या पर्यायाचा सर्वात सोपा फायदा म्हणजे तुम्हाला UIDAI वेबसाइटवर जावे लागणार नाही आणि पुन्हा पुन्हा कॅप्चा भरण्याच्या त्रासातून जावे लागणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा सहजपणे आधार डाउनलोड करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Volvo: 'सुपर ३०' ! वॉल्वो कंपनीची नवीन शानदार, जबरदस्त EX 30 कार; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा; जाणून घ्या कुठे कसा असेल मेगाब्लॉक

Chhagan Bhujbal News : भुजबळांचा डाव, 10 टक्के आरक्षणावर घाव? मंत्र्यांचा भुजबळांचा मराठा नेत्यांना थेट सवाल

Maharashtra Politics : ठाण्याच्या सुभेदारीवरुन नाईक-शिंदे भिडले; शिंदे-भाजपसाठी ठाणे महत्वाचं का? वाचा

SCROLL FOR NEXT