Viral News: 500 रुपयांची नोट बंद होणार? ATMमध्ये 100-200 च्याच नोटा मिळणार? काय आहे सत्य, जाणून घ्या

Fact Check 500 Currency Note Ban : 500 रुपयांची नोट आता बंद होणार आहे. होय, असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. पण, खरंच 500 रुपयांची नोट चलनातून बाद होणार आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
Fact Check 500 Currency Note Ban
Fact check: ₹500 note ban viral claim turns out to be false.saam tv
Published On
Summary
  • सोशल मीडियावर 500 रुपयांची नोट बंद होणार असल्याचा खोटा दावा व्हायरल.

  • एटीएममध्ये फक्त 100 आणि 200 च्याच नोटा मिळतील, हा दावा खोटा.

  • आरबीआय किंवा सरकारकडून 500 नोट बंद करण्याबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण नाही.

500 रुपयांची नोट बंद होणार असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय. सप्टेंबरपर्यंत 100 आणि 200 च्या 75 टक्के नोटा एटीएममध्ये लोडिंग करा अशा सूचना आरबीआयने बँकांना दिल्याचा दावा करण्यात आलाय.पण, खरंच 500 रुपयांची नोट बंद करण्याचा सरकारचा प्लान आहे का?

सप्टेंबरपर्यंत 75 टक्के आणि मार्चपर्यंत 90 टक्के 100-200 रुपयांच्या नोटा एटीएममध्ये टाका अशा सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्याचा दावा केलाय. इतकंच नव्हे तर मार्च 2026 पर्यंत 500 रुपयांची नोट बंद करणार असल्याचा दावा केलाय. पण, या दाव्यात कितपत तथ्य आहे? खरंच 500 रुपयांची नोट बंद करण्याचा सरकारचा विचार आहे का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती आरबीआयकडूनच मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमने याबाबत अधिक माहिती मिळवली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

500 रुपयांची नोट बंद होणार नाही

व्हायरल व्हिडिओतून केलेला दावा खोटा

500 रुपयांची नोट चलनात कायम राहणार

ATMमध्ये 100, 200 आणि 500च्या नोटा उपलब्ध

लोकांची दिशाभूल करण्यासाठी चुकीचा दावा

500 रुपयांची नोट ही चलनात कायम राहणार आहे.सोशल मीडियावरून चुकीचे मेसेज, व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केली जातेय. मात्र, आमच्या पडताळणीत 500 रुपयांची नोट बंद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com