Maharashtra Police: मोठी बातमी ! वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही पोलीस भरतीत संधी, आदेश जारी

Maharashtra Police Jobs 2025: महाराष्ट्र सरकारने १५,६३१ पदांसाठी पोलीस भरती जाहीर केली आहे. २०२२-२०२५ पर्यंतच्या वयस्कर उमेदवारांना वयात सूट देऊन आणखी एक संधी मिळते. महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ साठी लवकर अर्ज करा.
Maharashtra Police Jobs 2025
Maharashtra Police Bharti 2025: Government grants age relaxation, overaged candidates eligible for 15,631 posts.saam Tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रात १५,६३१ पदांसाठी पोलीस भरती जाहीर.

  • २०२२ ते २०२५ दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्यांना पुन्हा संधी.

  • गृह विभागाचा शासन निर्णय १० सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर.

राज्यातील तरुणांसाठी सरकारने गुडन्यूज दिलीय. पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने पोलीस भरती जाहीर केली आहे. यासह सरकारने आणखी एक आनंदाची बातमी दिलीय. ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडल्या गेली आहे, त्या तरुणांनाही पोलीस भरतीची संधी सरकारने करून दिलीय.

Maharashtra Police Jobs 2025
Police Bharti: पोलिस होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! १५,६३१ पदांसाठी भरती; या दिवशी सुरु होणार अर्जप्रक्रिया

राज्यात सुमारे १५ हजार ६३१ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलीय. दरम्यान आता यासाठी अर्जप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. आता या भरतीमध्ये सन २०२२ पासून २०२५ पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी या उमेदवारांना अर्ज करता करता येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय १० सप्टेंबर २०२५ रोजी गृह विभागाकडून जारी करण्यात आलाय. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या आणि वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांना ही नामी संधी चालून आलीय.

Maharashtra Police Jobs 2025
Police Death : नवी मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; पत्नीशी वादानंतर घरात आयुष्य संपवलं

राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली आणि २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेत १५ हजार पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे. पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. या पोलीस भरती प्रक्रियेकरीता ज्यांची वयोमर्यादा संपली होती, अशा सन २०२२ ते २०२५ पर्यंतच्या सर्व उमेदवारांना फॉर्म भरुन भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून याबाबतचे शुद्धिपत्रक काढण्यात आलंय.

दरम्यान गेल्या २-३ वर्षांपासून पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह विविध संघटनांकडून भरतीची मागणी केली जात होती. आता वयाची मर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही भरतीची संधी देण्यात आलीय.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत रिक्त झालेली आणि १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त होणारी एकूण १५,६३१ पदे भरतीसाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलीय.

शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांकानुसार सन २०२२ आणि सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे. शासनाच्या नव्या शुद्धपत्रकानुसार सन २०२२ , २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज करण्यास पात्र ठरविण्यात येईल, असं शासन परिपत्रकात म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com