8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

8th Pay Commission Implementation Date: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत. दरम्यान, आता याबाबत सरकारने माहिती दिली आहे.

Siddhi Hande

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?

सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

महागाई भत्ता आणि बेसिक सॅलरी एकत्र करण्याचा प्लान

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. नवीन वर्षापासून आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. मात्र, खरंच जानेवारी २०२६ पासून पगारवाढ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.

आठव्या वेतन आयोगासाठी टर्म्स ऑफ रेफरन्स जारी केले आहेत. मात्र, हा वेतन आयोग कधी लागू होणार याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आठव्या वेतन आयोगामुळे जवळपास ५० लाख कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. दरम्यान, हा वेतन आयोग नक्की कधी लागू होणार याबाबत सरकारने माहिती दिली आहे.

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? (When Will 8th Pay Commission Implemented)

संसदेत आठव्या वेतन आयोगाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली होती. आठव्या वेतन आयोगाची तारीख अजूनपर्यंत निश्चित नाहीये. ३ नोव्हेंबर रोजी टर्म्स ऑफ रेफरन्स जारी करण्यात आले आहे. याचा रिपोर्ट १८ महिन्यात दिला जाणार आहे. त्यानंतर वेतन आयोग लागू होईल.

महगाई भत्ता आणि बेसिक सॅलरी एकत्र करण्याचा प्लान

गेल्या अनेक दिवसांपासून बेसिक सॅलरीत महागाई भत्ता आणि DR जोडणार असल्याची चर्चा होती. मात्र, सध्या तरी याबाबत कोणताही प्रस्ताव नाही असं सांगण्यात आले आहे. मंत्र्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, DA आणि DR दर सहा महिन्यांनी वाढवला जातो. हा AICPI-IW इंडेक्सवर आधारिक असतो. सध्या डीए आणि डीआर हा ५५ टक्के आहे.

वेतन आयोग उशिराने लागू होण्याचे कारण (Why 8th Pay Commission Implementation Delay)

आठव्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी २०२५ मध्ये झाली होती. दरम्यान, त्यानंतर ९ महिन्यांनी टर्म्स ऑफ रेफरन्स जारी केले. यानंतर १८ महिन्यात रिपोर्ट दिला जाणार आहे. यानंतर नवीन सॅलरी स्ट्रक्चर तयार केले जाणार आहे. सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पगार वाढवून दिला जाणार आहे. त्यामुळेच आठवा वेतन आयोग लागू होण्यास उशिर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT