8th Pay Commission  saam tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या वेबसाइटवर नविन अपडेट; कर्मचाऱ्यांसाठी काय आहे खास?

Central Government Employees : आठव्या वेतन आयोगाच्या वेबसाइटवर पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा बॅनर झळकला आहे.

Sakshi Sunil Jadhav

8th Pay Commission Latest News: आठव्या वेतन आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर एक नवीन बॅनर दिसतोय. त्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये या अपडेटची चर्चा सुरू झाली. पण हा अपडेट पगारवाढ किंवा पेन्शनशी संबंधित आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला, यामागचं नेमकं कारण जाणून घेऊया.

वेबसाइटवर नेमका कोणता अपडेट आली?

आठव्या वेतन आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा बॅनर झळकत आहे. पंतप्रधान मोदी २९ नोव्हेंबर रोजी 'मन की बात'चा १४० वा भाग प्रसारित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून सूचना आणि विषय मागवण्यात आले आहेत. नागरिकांना आपल्या सूचना थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचवता येणार आहेत.

कर्मचाऱ्यांसाठी हा अपडेट किती महत्त्वाचा?

आठव्या वेतन आयोगाच्या वेबसाइटवर दिसणाऱ्या या बॅनरचा कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीशी किंवा पेन्शनमधल्या बदलांशी थेट संबंध नाही. हा केंद्र सरकारच्या जनजागृती आणि प्रचार संदेशाचा भाग आहे. नागरिकांना 1800-11-7800 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून हिंदी किंवा इंग्रजीमध्ये आपला मेसेज रेकॉर्ड करता येईल. तर १९२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन एसएमएसद्वारे मिळणाऱ्या लिंकच्या माध्यमातूनही सूचना पाठवता येतील. निवडक संदेश 'मन की बात' कार्यक्रमात समाविष्ट केले जाऊ शकतात.

यापूर्वी आठव्या वेतन आयोगाच्या वेबसाइटवर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याबाबतचा बॅनर झळकला होता. सरकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या वेबसाइटवर अशा प्रकारचे बॅनर दाखवले जातात.

आठव्या वेतन आयोगाची स्थापना कधी झाली?

आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आली. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पुलक घोष अंशकालीन सदस्य, तर पंकज जैन सदस्य-सचिव आहेत. नवीन वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakshmi Puja Tips: लक्ष्मी पूजनाला नकळतही आणू नका 'या' वस्तू; यामुळे होऊ शकतो लक्ष्मी मातेचा अपमान, वेळीच चुकं सुधारा

Maharashtra News Live Update: ऐन दिवाळीत झेंडू उत्पादक शेतकरी संकटात

Gold Rate : लक्ष्मीपूजेनिमित्त सुवर्ण बाजारात ग्राहकांची गर्दी, १ तोळा सोन्याचा इतका आहे दर; वाचा

Peda Recipe: घरच्या घरी बनवा बाजारासारखे दाणेदार मऊसूत पेढे; जाणून घ्या सोपी रेसिपी

दिवाळीच्या खरेदीला निघाले, रस्त्यातच ट्रकने चिरडले; तिघांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा; अहिल्यानगरमध्ये हळहळ

SCROLL FOR NEXT