8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार? आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांनी एक विशेष मागणी केली आहे. आठव्या वेतन आयोगात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली आहे. याबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगात जुनी पेन्शन योजना लागू होणार?

कर्मचाऱ्यांची जन्या पेन्शन योजनेची मागणी

सरकार नक्की काय निर्णय घेणार?

आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगातील पगारवाढीची कर्मचारी वाट बघत आहेत. दरम्यान, पगारवाढ कधीपासून येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, आठव्या वेतन आयोगातील अटी आणि नियमांबाबत माहिती समोर आली आहे. यानंतर आता कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली आहे.

कर्मचारी संघटना नॅशनल पेन्शन स्कीम आणि युनिफाइड पेन्शन स्कीम मागे घेण्याची मागणी करत आहेत. कन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गवर्नमेंट एम्प्लॉयीज अँड वर्कर्स आणि ऑल इंडिया डिफेंस एम्प्लॉयीज फेडरेशन (AIDEF) या युनियनने जॉइंट कंसल्टेटिव मशीनरी (NC-JCM)कडे आपल्या मागण्या दिल्या आहेत. यामध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांसाठी काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या पेन्शन योजनेची मागणी केली जात आहे. दरम्यान, याबाबत निर्णय होण्याची शक्यता फार कमी असल्याचे दिसत आहे.

सव्वा लाख कर्मचाऱ्यांची यूपीएसला पसंती

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ पर्यंत जवळपास १,२२,१२३ कर्मचाऱ्यांनी यूपीएस योजनेची निवड केली आहे. यामध्ये सध्याचे कर्मचारी, रिटायर्ड कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. २५ लाख कर्मचाऱ्यांपैकी फक्त ४ ते ५ टक्के कर्मचाऱ्यांनी यूपीएसची निवड केली आहे. यामध्ये रेल्वे, सिविल स्टाफचा समावेश आहे. दरम्यान, डेडलाइन दिल्यानंतरही लाखो कर्मचाऱ्यांनी यूपीएस योजनेची निवड केली नाही. त्यामुळे यूपीएस योजनेवर कर्मचाऱ्यांचा विश्वास नसल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका, 'या' शहरात ११२ रुपयांना पेट्रोलची विक्री; तुमच्या शहरातील दर किती?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी प्रश्न पुरवण्याचा बदल्यात हवालदार यांनी रोख रक्कम स्वीकारल्याचं सीबीआय तपासात स्पष्ट

Crime News: खोलीत बोलवून जबरदस्तीने किस, नंतर प्राइव्हेट पार्टला...; बॉक्सिंग कोचचं अल्पवयीन तरुणीसोबत विकृत कृत्य

कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाला जीवे मारण्याची धमकी; घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त, पाहा VIDEO

PM Modi - Donald Trump : मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा PM मोदींसाठी महत्वाचा निरोप; व्हाइट हाऊस भेटीचं निमंत्रण धाडलं

SCROLL FOR NEXT