8th pay commission update 
बिझनेस

आठव्या वेतन आयोगावर सर्वात मोठी अपडेट, कधी लागू होणार? किती पगार वाढणार? सगळी माहिती समोर

8th Pay Commission update : आठवा वेतन आयोग कधी लागू होणार आणि पगार किती वाढणार? सरकारने दिलेल्या ताज्या माहितीनुसार अंमलबजावणी, संभाव्य पगारवाढ आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

salary hike government employees 8th Pay Commission update : आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? पगार किती वाढणार? याकडे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचा नजरा खिळल्या आहेत. त्याबाबत आता सरकारकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे. ससंदेत सरकारकडून आठवा वेतन आयोग कधी लागू शकतो, याबाबतची माहिती दिली आहे. लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आठवा वेतन आयोगाची वाट पाहत आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आठवा वेतन आयोगाची माहिती दिली आहे. (8th pay commission expected salary hike percentage India)

केंद्र सरकारकडून ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची औपचारिकपणे स्थापना केल्याचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत सांगितले. ते म्हणाले की, 'केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन यांसंबंधी शिफारशींसह पूर्ण अहवाल सादर करण्यासाठी या आयोगाला १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. हा अहवाल सादर होऊन तो स्वीकारल्यानंतरच आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी करायची हे ठरवलं जाईल. आयोग सध्या आपला अहवाल तयार करत आहे.'

आयोग आठवा वेतन आयोगाबाबत एकाच दृष्टिकोनाने काम केले जात नाही. त्यासाठी वेगवेगळ्या श्रेणींकडून सक्रियपणे सूचना मागवल्या जात आहे. MyGov या पोर्टलवर अठरा वेगवेगळे प्रश्न अपलोड करण्यात आले आहेत. मंत्रालये, विभाग, राज्य सरकारे, कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, संघटना, शिक्षणतज्ज्ञ आणि अगदी व्यक्तींकडूनही यावर मते मागवलेली आहेत. त्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. हा अभिप्राय फक्त ऑनलाइनच स्वीकारला जाईल.

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारवाढ कधी होणार?

आठवा वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाला, तरीही १ जानेवारी २०२६ पासून पगारवाढ लागू मानली जाईल. पण त्याचे फायदे कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचायला अधिक वेळ लागू शकतो, असे GenZCFO चे संस्थापक सीए मनीष मिश्रा यांनी आजतकला सांगितले.

कागदोपत्री आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. पण प्ररत्यक्षात वाढीव पगार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात २०२६ च्या शेवटी अथवा २०२६-२७ या आर्थिक वर्षातच जमा होण्याची शक्यता मिश्रा यांनी व्यक्त केला. अगदी मागील वेतन आयोगांनंतर झालेल्या विलंबाप्रमाणेच आठवा वेतन आयोगही विलंब झाल्याचेही ते म्हणाले.

आठव्या वेतन आयोगानंतर पगार किती वाढणार ?

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर किती पगार वाढणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण प्राथमिक अंदाजानुसार पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगासारखीच सर्व प्रकारची वाढ पगारात होईल. प्रतीक वैद्य म्हणाले की, मागील आयोगाचे कार्य आणि सध्याची अर्थव्यवस्था यावर पगारवाढ होतो. सहाव्या वेतन आयोगाच्या काळात पगारात अंदाजे ४० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर सातव्या वेतन आयोगाच्या काळात ही वाढ २३ ते २५ टक्क्यांपर्यंत होती. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत असलेले पगारदेखील याच घटकावर अवलंबून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paithani Saree Contrast Blouse: लग्नसराईत पैठणी साडीवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी आणि स्वस्त लेटेस्ट डिझाईन्स ब्लाऊज

पेट्रोल निर्यातीवर रशियाची बंदी, १ एप्रिलपासून भारतावर काय होणार परिणाम? सोप्या शब्दात घ्या समजून

Maharashtra Live News Update: - भंडाऱ्यातील साकोलीत असलेल्या बांबूच्या झाडांना भीषण आग

Water consumption: जेवणानंतर पाणी पीत नसाल तर शरीरात काय बदल होतात?

अबब! लग्न समारंभात वधूवर ८ कोटी रुपयांची रोकड उधळली? व्हायरल व्हिडिओमागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT