8th CPC Update google
बिझनेस

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

8th Pay Commission latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. बेसिक सॅलरीबाबत ही मोठी अपडेट आहे. तुम्हाला यावर तुमच्या बेसिक सॅलरीचा अंदाज येऊ शकतो.

Sakshi Sunil Jadhav

क्रेंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आठव्या वेतनाबाबत (8th Pay Commission) जोरदार चर्चा सुरु आहेत. यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर पुढच्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर केला जाण्याची शक्यता आहे. त्यातच विविध क्षेत्रातील कर्मचारी त्यांच्या मागण्या आयोगाकडे सादर करत आहेत.

आठव्या वेतन आयोगातील सर्वात महत्वाच्या फिटमेंटबाबत सध्या कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहेत. याबाबत महत्वाची समोर आली आहे. कारण फिटमेंट फॅक्टरवरच तुमची बेसिक सॅलरी अवलंबून असते. त्यामुळे नवीन वेतन आयोग लागू केल्यानंतर टेक होम सॅलरीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

अंदाजे फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो?

सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवला होता. आता कर्मचारी संघटनांची मागणी 3 किंवा त्यापेक्षा जास्त फिटमेंट फॅक्टर असावा अशी आहे. तर तज्ज्ञांच्या मते, सरकार 2.86 फिटमेंट फॅक्टर लागू करण्याचा सध्या विचार सुरू करत आहे.

पगार किती वाढू शकतो?

तुम्ही मागच्या वेतन वाढीचा अंदाज घेतला तर, उदा. समजा एका कर्मचाऱ्याची बॅसिक सॅलरी ही 18,000 रुपये आहे. आता त्याला 60 टक्के महागाई भत्ता (DA) मिळत असेल, तर त्याचं एकूण वर्षाचं उप्तन्न सध्या 35,000 ते 40,000 रुपयांपर्यंत असू शकतं.

जर आठव्या वेतन आयोगात 2.86 फिटमेंट फॅक्टर लागू झाला, तर त्याची बेसिक सॅलरी ही 51,480 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार महागाई भत्ता, घरभाडं भत्ता (HRA) आणि इतर भत्त्यांतही वाढ होईल. त्यामुळे एकूण महिन्याचा पगार 75,000 ते 90,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. ही कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

DA मुळे होणारा फायदा

कर्मचारी संघटनांचे म्हणणं आहे की, सरकारने 50 टक्क्यांपेक्षा जास्त महागाई भत्ता बेसिक सॅलरीत जोडला तर कर्मचाऱ्यांना आणखी मोठा फायदा होऊ शकतो. यामुळे HRA, ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि इतर रिटायरमेंटच्या पैशात वाढ होऊ शकते. आत्तापर्यंत अंतिम शिफारशी जाहीर झालेल्या नसल्या तरी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात खाद्यतेलावर धडक कारवाई

Breast Cancer : महिलांनो ब्रेस्ट दुखणं सामान्य नाही; कॅन्सरचा असू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या ६ लक्षणे?

Sunday Horoscope : देवीच्या कृपेने पैसा वाढवण्याची मोठी संधी मिळेल, ६ राशींनी राहा सावध; वाचा रविवारचे राशीभविष्य

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

SCROLL FOR NEXT