Aadhaar Card: आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, २ मिनिटांतच मिळवा आधार क्रमांक; फक्त फोलो करा या स्टेप्स

Aadhaar Update: बऱ्याच जणांचं आधार कार्ड ऐनवेळी सापडत नाही. त्यामुळे ते गोंधळात अडकतात आणि महत्वाची कामंही रखडतात. पुढील बातमीत आधार कार्डाच्या नंबरशिवाय आधार डाउनलोड कसं करायचं हे आपण जाणून घेणार आहोत.
UIDAI Aadhaar Recovery
UIDAI Aadhaar Recoverygoogle
Published On

आधार कार्ड हा सर्वांचा महत्वाचा पुरावा आहे. तुम्हाला शाळेपासून ते मोबाईल वापरासाठी सगळ्याच कामासाठी हा पुरावा महत्वाचा असतो. पण बऱ्याचदा आधार कार्ड हरवतं. कधीकधी आपल्याकडे आधारकार्डचा नंबरही नसतो. ऐनवेळी आपली धावपळ होते. पुढील बातमीत आपण २ मिनिटांत आधारनंबर कसा मिळवायचा हे जाणून घेणार आहोत.

आधार कार्ड हरवल्यावर सर्वात आधी केलं पाहिजे?

जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल तर UIDAI युजर्सना एक विशेष सुविधा दिली जाते. त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार सहजपणे आणि जलदपणे मिळू शकतं. मात्र त्यासाठी तुमचा फोन नंबर किंवा ईमेल आयडी तुमच्या आधारशी लिंक केलेला असायला हवा. जर यापैकी कोणतीही माहिती आधारला जोडलेली असेल तर पुढील प्रोसेस फॉलो करा.

UIDAI Aadhaar Recovery
Heart Attack Tests: हार्ट अटॅकची भीती वाटतेय? मग आत्ताच करा या 2 टेस्ट, डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

UIDAI वेबसाइटवरून आधार क्रमांक मिळवण्याची प्रोसेस

स्टेप १

सर्वप्रथम, UIDAI अधिकृत वेबसाइट लॉगिन करा. तुम्हाला "Retrieve Lost or Forgotten EID/UID" " हा ऑप्शन दिसेल. या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेत त्यामध्ये लॉगिन करा.

स्टेप २

पुढे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेलवर एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर, UIDAI तुमचा आधार क्रमांक तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल पत्त्यावर येईल.

स्टेप ३

तुम्हाला UIDAI च्या आधार क्रमांक रिकवरी सेवेचा वापर यासाठी करावा लागेल. तुमचं पूर्ण नाव, रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी तिथे टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल.

स्टेप ४

OTP तिथे टाका. मग UIDAI तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा नोंदणी आयडीची माहिती SMS किंवा ईमेलमध्ये पाठवली जाईल. ही सोपी प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागेल.

स्टेप ५

एकदा तुमच्याकडे तुमचा आधार क्रमांक आला की, तुम्ही तुमचं ई-आधार डाउनलोड करू शकता. हे करण्यासाठी, UIDAI वेबसाइटवर "Download Aadhaar" या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. मग तुमचा आधार क्रमांक त्यात लिहावा लागेल. OTP टाकावा लागेल आणि तुमचं ई-आधार PDF डाउनलोड करावं लागेल. ही सोपी प्रोसेस फॉलो करून तुम्हाला ई-आधार मिळेल. त्याचाही वापर तुम्ही करू शकता.

UIDAI Aadhaar Recovery
Naturally Pink Lips: नॅच्युरली गुलाबी ओठ हवेत? मग झोपण्याआधी लावा हे २ पदार्थ अन् पाहा चमत्कार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com