8th Pay Commission  Google
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! पगार ४ पटीने वाढणार? बेसिक सॅलरी इतकी होणार; वाचा कॅल्क्युलेशन

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ किती व्हावी, याबाबत कर्मचारी संघटनांनी प्रस्ताव ठेवला आहे. पगारवाढ ही ४ पटीने व्हावी, असं कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार?

पगार ४ पटीने वाढण्याची शक्यता

बेसिक सॅलरी ७२००० करण्याची मागणी

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी मिळणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. दरम्यान, आता आठव्या वेतन आयोगात पगारवाढ किती मिळावी, यासाठी कर्मचारी संघटनांकडून प्रस्ताव मागितले जात आहे.

कर्मचारी संघटनांनी वेतन, भत्ता आणि इतर गोष्टींमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. संघटनांनी काही प्रस्ताव ठेवले आहेत. जर या प्रस्तावांना मंजुरी मिळाली तर कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे.

वेतन रचनेत बदल करण्याची मागणी (8th Pay Commission Fitment Factor)

कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे. हा फिटमेंट फॅक्टर २.६२ ते ३.८३ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. वार्षिक पगारवाढ ३ टक्क्यांवरुन ६ ते ७ टक्के करण्याची मागणी केली जात आहे.सध्याची महागाई बघता हा बदल गरजेचा आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होऊ शकते, असं संघटनांचे म्हणणे आहे.

पगार ४ पटीने वाढणार (8th Pay Commission Salary Hike)

भारतीय प्रतिरक्षा मजूर संघ (BPMS)ने बेसिक सॅलरी ७२,००० रुपये करण्याची मागणी केली आहे. ही सध्याच्या सॅलरीपेक्षा ४ पट जास्त आहे. याचसोबत फिटमेंट फॅक्टर ४ ठेवण्याची मागणी केली जात आहे. उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांचे वेतन १० लाखांपर्यंत करण्याचाहा प्रस्ताव दिला आहे.जर सरकारने या मागण्या मान्य केल्या तर कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे बेलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Pune : मुसळधार पावसात भयंकर घटना, पुण्यात खड्ड्यात बुडून २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, नेमकं झालं काय?

8th Pay Commission: सोन्याच्या किंमतीवर ठरणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार? DA, HRA, पेन्शन आणि एरिअरबाबत मोठा खुलासा

EPFO Update : EPFO चा मोठा निर्णय! तुमच्या संमतीशिवाय PF कापला जाणार नाही, १८०० रुपये अनिवार्य राहणार

पुण्यातील स्टील व्यापाऱ्याला ५ कोटींची खंडणी... अन् बिश्नोई गँगचा गेम उलटला; राजस्थानमधून मुख्य आरोपी गजाआड!

SCROLL FOR NEXT