8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात मिळणार १० ते १६ लाखांचा एरियर

8th Pay Commission Salary Hike Arrears Update: आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात कधीपासून लागू होणार याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.कर्मचाऱ्यांना एरियर मिळणार आहे. जवळपास १० ते १६ लाखांपर्यंत एरियर मिळू शकतो.
8th Pay Commission
8th Pay Commission Google
Published On
Summary

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

कर्मचाऱ्यांना मिळणार १० ते १६ लाखांचा एरियर

सरकारी कर्मचाऱ्यांना होणार फायदाच फायदा

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे. दरम्यान, जोपर्यंत आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना एरियर दिला जाणार आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा एरियर मिळणार आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट; पगार ३४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. यातील महत्त्वाची मागणी म्हणजे फिटमेंट फॅक्टर. कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे जर ३.८३ फिटमेंट फॅक्टर लागू केला तर कर्मचाऱ्यांना चांगलीच पगारवाढ मिळणार आहे. आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे. त्यामुळे तेव्हापासूनचा एरियर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना १० लाखांपर्यंत एरियर मिळू शकतो.

फिटमेंट फॅक्टरवर ठरणार पगारवाढ (8th Pay Commission Fitment Factor)

सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर ठरवली जाते. कर्मचाऱ्यांनी ३.८३३ फिटमेंट फॅक्टर ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे.जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर त्यानंतर बेसिक सॅलरी १८००० रुपयांवरुन ६९००० रुपये होणार आहे.

एरियर कधीपासून मिळणार? (8th Pay Commission Arrears)

जर आठवा वेतन आयोग २०२७ मध्ये लागू झाला तरी त्याचे कॅल्क्युलेशन १जानेवारी २०२६ पासून केले जाणार आहे. या महिन्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना एरियर दिला जाणार आहे. जर सप्टेंबर २०२७ मध्ये आठवा वेतन आयोग लागू झाला तर २० महिन्यांचा एरियर मिळू शकतो.

किती मिळणार एरियर? (How Much Arrear Government Employee Get)

लेव्हल १ कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८००० रुपये आहे. ही सॅलरी ६९००० होईल. यामध्ये ५१००० रुपयांचा फरक असेल. त्यानुसार २० महिन्यांसाठी १०.२ लाख रुपये मिळू शकतात. लेव्हल २ कर्मचाऱ्यांना ११.२७ लाख रुपये, लेव्हल ३ कर्मचाऱ्यांना १२.२९ लाख रुपये, लेव्हल ४ कर्मचाऱ्यांना १४.१४ लाख रुपये तर लेव्हल ५ कर्मचाऱ्यांना १६.५४ लाख रुपये एरियर मिळू शकतो.

8th Pay Commission
8th Pay Commission: ६ टक्के पगारवाढ बेसिक सॅलरी ६९,००० अन् बरंच काही; फिटमेंट फॅक्टरबाबत कर्मचाऱ्यांच्या मागण्या

दरम्यान, जर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या तर त्यानंतरच कर्मचाऱ्यांना एवढा एरियर मिळणार आहे. फिटमेंट फॅक्टरवर पगारवाढ आणि परिणामी एरियर अवलंबून असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नक्की किती रुपयांचा एरियर मिळणार याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

8th Pay Commission
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत डेडलाइन वाढली; आजच करा हे काम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com