आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट
कर्मचाऱ्यांचा पगार ३५ टक्क्यांनी वाढणार
फिटमेंट फॅक्टर किती असणार?
केंद्र सरकारने २०२५ मध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली. हा नवीन वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे. वेतन आयोग लागू झाला असला तरी प्रत्यक्ष पगारवाढ येण्यास अजून उशिर आहे. मागच्यावेळी २०१६ मध्ये ७वा वेतन आयोग लागू झाला होता. दर १० वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन आणि महागाई भत्त्यात बदल केला जातो.
आठव्या वेतन आयोगाचे काम सुरु आहे. यासाठी वित्त मंत्रालयाने कर्मचारी, पेन्शनधारक, कर्मचारी संघटनांकडून सूचना मागितल्या आहेत. यासाठी ऑनलाइन पोर्टलदेखील सुरु केले आहे. ही सुविधा ३० एप्रिल २०२६ पर्यंत सुरु राहणार आहे. आठव्या वेतन आयोगाचा रिपोर्ट देण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी दिला आहे.
पगारवाढ (8th Pay Commission Salary Hike)
७व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार चांगला वाढला होता. यावेळी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८,००० रुपये केली होती. तर कमाल सॅलरी २.५ लाख रुपये होते. आता आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहेत.त्यात बदल होऊ शकतो.
आठवा वेतन आयोग हा फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असतो. तुमच्या बेसिक सॅलरीला फिटमेंट फॅक्टरने गुणले जाते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, फिटमेंट फॅक्टर २.४ ते ३.० मध्ये असू शकतो. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांचा पगार २० ते ३५ टक्क्यांनी वाढू शकतो. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अर्थ तज्ज्ञांच्या मते, वेतनात वाढ ही अनेक गोष्टींवर निर्भर असते. सध्याची महागाई, सरकारची वित्तीय क्षमता, टॅक्स तसेच मागच्या आयोगाच्या शिफारसीवर यंदाची पगारवाढ अवलंबून असते. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आठवा वेतन आयोग लागू करावा लागतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.