केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची चर्चा सध्या सुरू आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचं लक्ष फिटमेंट फॅक्टरकडे लागले आहे. फिटमेंट फॅक्टर किती हे ठरणार कधी, यावर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात किती वाढ होईल, हे अवलंबून असेल. ४,३.८३३ आणि ३.८० या तीन पर्यायांनुसार लेव्हल ४ आणि लेव्हल ५ मधल्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार किती होऊ शकतो, याची गणितं समजून घेऊया.
सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. आता आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचारी संघटनांकडून जास्त फिटमेंट फॅक्चरची मागणी केल्याचं वृत्त आहे. महाराष्ट्र ओल्ड पेन्शन ऑर्गनायझेशनकडून ३.८० फिटमेंट फॅक्टरची मागणी करण्यात आली आहे. मात्र, हे प्रस्तावित आकडे आहेत. आठव्या वेतन आयोगाचा अंतिम फिटमेंट फॅक्टर अजून ठरवला गेला नाही.
सध्या ७ व्या वेतन आयोगानुसार लेव्हल ४ मधल्या कर्मचाऱ्यांचे सुरुवातीचे बेसिक वेतन २५,५०० रुपये आहे. यावर वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर लावल्यावर पुढचे आकडे मिळतात.
४ फिटमेंट फॅक्टर - १,०२,००० रुपये
३.८३३ फिटमेंट फॅक्टर - ९७,७४१.५० रुपये, म्हणजे अंदाजे ९७,७४२ रुपये
३.८० फिटमेंट फॅक्टर - ९६,९०० रुपये
लेव्हल ५ मधल्या कर्मचाऱ्यांचे सध्याचे सुरुवातीचे बेसिक वेतन २९,२०० रुपये आहे. त्यानुसार संभाव्य पगार पुढीलप्रमाणे असेल.
४ फिटमेंट फॅक्टर - १,१६,८०० रुपये
३.८३३ फिटमेंट फॅक्टर - १,११,९२३.६० रुपये, म्हणजे अंदाजे १,११,९२४ रुपये
३.८० फिटमेंट फॅक्टर - १,१०,९६० रुपये
आठव्या वेतन आयोगाला आपल्या स्थापनेपासून १८ महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यानंतर केंद्र सरकार अहवालाचा अभ्यास करून पुढचे निर्णय घेईल. जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीची तारीख आणि थकबाकीबाबतचा अंतिम निर्णय सरकारकडूनच स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.