Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Sakshi Sunil Jadhav

गिझरचा वापर

काही महिन्यांनी हिवाळा ऋतू सुरू होईल. या दिवसात घरामध्ये आपण गिझरचा वापर जास्त प्रमाणात करू शकतो.

geyser safety precautions

सेफ्टी व्हॉल्व्ह तपासा

गिझरमधला जास्तीचा दाब नियंत्रित करणारा व्हॉल्व्ह व्यवस्थित काम करत आहे का, याची खात्री करा.

water heater safety

थर्मोस्टॅटची तपासणी करा

पाणी गरम झाल्यानंतर गिझर बंद होत नसेल, तर वापर थांबवून तंत्रज्ञाकडून तपासणी करा.

geyser maintenance tips

वायरिंग आणि अर्थिंग तपासा

सैल वायर, जळालेले कनेक्शन आणि चुकीची अर्थिंग यामुळे विजेचा धक्का किंवा आग लागू शकते.

geyser maintenance tips

पाण्याची गळती तपासा

गिझरमधून पाणी गळत असल्यावर किंवा टाकीला गंज लागल्याने दुर्लक्ष करू नका.

geyser accident prevention

विचित्र आवाजांकडे लक्ष द्या

गिझरमधून असामान्य आवाज येत असल्यावर कारण शोधण्यासाठी तंत्रज्ञाकडून तपासणी करून घ्या.

geyser accident prevention

तापमान योग्य ठेवा

निर्मात्याच्या सूचनांनुसार तापमान सेट करा आणि पाणी अतिशय गरम होत असल्यावर गिझर बंद करा.

geyser accident prevention

फिटिंग सुरक्षित ठेवा

गिझरचे पाइप, जोडणी आणि भिंतीवरच्या फिटिंग योग्य प्रकारे बसवले आहेत का, हे तपासा.

geyser servicing tips

सुरक्षिततेचे नियम पाळा

वेळेवर सर्व्हिसिंग करा, जळण्याचा वास, धूर किंवा विद्युत बिघाड जाणवल्यास गिझर वापरणे थांबवा आणि तज्ज्ञांची मदत घ्या.

geyser servicing tips

NEXT : रात्री पायाला तूप लावल्याने काय फायदा होतो? मालिश करण्याची योग्य पद्धत काय?

Ghee Benefits | meta ai
येथे क्लिक करा