Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Silver Price Today : १८ ऑक्टोबर रोजी सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठवड्याभरात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.
Gold Rate Today
Gold Silver meta ai
Published On: 

तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या एका आठवड्यात देशात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव काही शहरांमध्ये १० ग्रॅममागे ३,७६० पर्यंत कमी झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात ३,४५० पर्यंत घट झाली आहे. चांदीचा भावही आठवडाभरात प्रति किलो १०,००० रुपयांनी घसरला. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं लक्ष आता बाजारातल्या दरांकडे लागलं आहे.

दिल्लीतला सोन्याचा भाव किती?

१८ ऑक्टोबर सकाळच्या दरानुसार, राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,४७,८१० आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३५,५०० नोंदवण्यात आला आहे.

Gold Rate Today
Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्रलंबित, शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4,000 कधी येणार?

मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि पुणे या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४७,६६०, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३५,३५० आहे. अहमदाबाद आणि भोपाळमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४७,७१०, तर २२ कॅरेटचा दर १,३५,४०० आहे. जयपूर, लखनऊ आणि चंदीगडमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४७,८१० आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १,३५,५०० आहे.

Gold Rate Today
Chanakya Niti : या ३ गोष्टींवर पैसा खर्च करताना कंजूषी करू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. १८ ऑक्टोबरच्या सकाळच्या दरानुसार, चांदीचा भाव प्रति किलो २,३०,००० आहे. आठवड्याभरात चांदी १०,००० ने स्वस्त झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, इंदूरच्या सराफा बाजारात शनिवारी चांदीचा सरासरी भाव २०० ने घसरून प्रति किलो २,१३,८०० झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव प्रति औंस ५७.०५ डॉलर होता.

सोनं-चांदीचे दर का बदलतात?

आंतरराष्ट्रीय बाजारातली किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, मागणी-पुरवठा आणि जागतिक आर्थिक घडामोडी यांचा सोनं-चांदीच्या दरांवर परिणाम होतो. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये दरांमध्ये फरक दिसू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com