8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढणार? आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, फॅमिली युनिट वाढवल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढू शकतो.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बातमी

कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढणार

फॅमिली युनिट ५ पर्यंत वाढवण्याची मागणी

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केला आहे.हा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारवाढ २०२६ जानेवारीपासून मिळणार आहे. मात्र, प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या हातात वाढलेला पगार कधी येणार असा प्रश्न पडलेला आहे. आठव्या वेतन आयोगासाठी आता पाऊले उचलली जात आहे.

मागच्या महिन्यात नॅशनल काउंसिल आणि जॉइंट कंसल्टेटिव्ह मिशनरी यांची मीटिंग झाली. यामध्ये वेतन आयोगा फॅमिली युनिट ३ वरुन करण्याची मागणी केली आहे. जर असं झालं तर थेट कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार आहे. कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्के वाढू शकतो.

फॅमिली युनिट काय आहे?

मिडिया रिपोर्टनुसार, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉयी फेडरेशनने सेक्रेटरी जनरल सी श्रीकुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तीन फॅमिली युनिटचा फॉर्म्युला १९५६ नुसार १५ व्या इंडियन लेबल कॉन्फरन्सअंतर्गत येतो. यावर बेसिक सॅलरी मोजली जाते.

फॅमिली युनिट वाढवण्याची मागणी

या प्रकरणामध्ये युक्तीवाद करतात की,पालक ही मुलांची कायदेशीर जबाबदारी आहे. त्यामुळे फॅमिली युनिटमध्ये पालकांचाही समावेश करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे फॅमिली युनिट ५ सदस्यांची करण्याची मागणी केली जात आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, जर फॅमिली युनिटची संख्या पाच केली तर मूळ वेतनात ६६ टक्क्यांची वाढ होईल.एका सदस्याची वाढ केल्यानंतर पगारात ३३.३३ टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होईल.

जर फॅमिली युनिट कायदा लागू झाला तर कर्मचाऱ्यांचा पगार चांगला वाढणार आहे. महागाई भत्ता हा ८ टक्क्यांनी वाढू शकतो आणि वार्षिक १२ टक्क्यांनी वाढू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil : "हिल हिल पोरी हिला तुझ्या प्रेमात झालो फिदा..."; गौतमी पाटीलचा नखरा पाहून नेटकरी घायाळ, 'ते' Photos आले समोर

Bleeding Gums: दात घासताना हिरड्यांतून रक्त येतंय? दुर्लक्ष करू नका; असू शकते गंभीर समस्येची सुरुवात

Maharashtra politics : राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा उभी फूट पडणार? 'एनडीए'चा मोठा प्लॅन

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पेन्शन, प्रमोशन अन् सॅलरीत वाढ होणार, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update : पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी होणार खुलं

SCROLL FOR NEXT