Pension Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानुसार पेन्शन किती होणार? किती टक्क्यांनी वाढणार? वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरे

Pension Under 8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लवकरच लागू केला जाणार आहे. नवीन वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये भरघोस वाढ होणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. आठव्या वेतन आयोगात पेन्शधारकांचीही पेन्शन वाढणार आहे. पेन्शन वाढल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. परंतु किती टक्के पेन्शन वाढणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाबी.

आठव्या वेतन आयोगात निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये भरघोस वाढ होणार की मध्यम असे प्रश्न सध्या विचारले जाणार आहे. आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. (8th Pay Commission)

आठवे वेतन आयोग २०२६ मध्ये लागू होण्याची शक्यता आहे. दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केली जाते.मागील सातवा वेतन आयोग हा २०१६ रोजी लागू करण्यात आला होता.यासाठी आयोगाचे चेअरमन आणि दोन सदस्य अशी समिती स्थापन केली जाणार आहे. त्यानंतर वेतनात किती वाढ होणार याबाबत चर्चा केली जाईल. (Pension Under 8th Pay )

वेतन हे फिटमेंट फॅक्टरद्वारे ठरवले जाते. केंद्रिय कर्मचारी आणि पेन्स ही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार मिळते. याबाबत तज्ञांनी आपली मते व्यक्त केली आहेत. जर फिटमेंट फॅक्टर २.५ किंवा २.८ धरला तर ९ हजार रुपयांची पेन्शन २२,५०० ते २५,२०० होऊ शकते. आठव्या वेतन आयोगानुसार २० ते ३० टक्के पेन्शन वाढून मिळू शकते असंही मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

जर फिटमेंट फॅक्टर २.८६ मंजूर केला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात १८६ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. त्यामुळे आठव्या वेतन आयोगानुसार, कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. याचसोबत पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weak Heart Signs: हातांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Sunday Horoscope: अचानक पैसा येईल, ५ राशींवर सुर्यदेव होणार प्रसन्न; वाचा रविवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांच्या प्रश्नी रस्त्यावर उतरण्याचा काँग्रेसचा इशारा

ICC Rules : क्रिकेट विश्वात उडणार खळबळ; आयसीसी बदलणार ४ नियम, सामना सुरू असतानाच चेंडू बदलणार रंग

Joint Pain Relief Tips: लहान वयातच तुम्हाला हाडं आणि सांधेदुखीचा त्रास होतोय का? या उपायांमुळे मिळेल आराम

SCROLL FOR NEXT