Old Pension Scheme News: पेंशन धारकांच्या मागण्यांसाठी रोखला मुंबई– आग्रा महामार्ग

Mumbai Agra Highway: पेंशन धारकांच्या मागण्यांसाठी रोखला मुंबई– आग्रा महामार्ग
Dhule News
Dhule NewsSaam tv

Dhule News: ईपीएस ९५ पेन्शन धारकांच्या प्रलंबित मागण्या केंद्र सरकारने तातडीने मंजूर करून न्याय द्यावा; या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनांतर्गत धुळ्यात (Dhule News) देखील पेन्शन धारक आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. (Latest Marathi News)

ईपीएस 95 पेन्शनधारकांबाबत सरकार म्हणजे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना दुटप्पीपणा करीत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांतर्फे यावेळी लावण्यात आला आहे. या आंदोलनात ६० ते ८० वयाचे सदस्य सपत्नीक सहभागी झाले होते. महागाईचा विचार न करता पेन्शनमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याने पेन्शनधारक संतप्त झाल्याचे बघावयास मिळाले आहे.

Dhule News
H3N2 Virus: जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती

वाहतूक खोळंबली

रस्त्यावर उतरून या सर्व आंदोलकांनी मुंबई– आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) रास्ता रोको केल्याचे बघावयास मिळाले आहे. धुळे शहराबाहेर मुंबई- आग्रा बायपास रोड नगावबारी चौफुली जवळ हा रास्ता रोको करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे दोन्ही बाजुकडील वाहतूक काही काळ थप्प झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com