
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन लागू करण्याची घोषणा सरकारने केली आहे.काल कॅबिनेट बैठकीत आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करायला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रिय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे.(8th Pay Commission)
हा आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतना सुधारणा करण्यासाठी शिफारसी करेल. या आयोगाला २०२६ पर्यंत अहवाल सादर करायला सांगितले आहे. याबाबत अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी ८ व्या वेतन आयोगाना मंजुरी दिली आहे. लवकरच आठव्या वेतन आयोगासाठी अध्यक्ष आणि दोन सदस्यांनी नियुक्ती करण्यात येणार आहे.
आठवा वेतन आयोग लागू केल्यावर केंद्रिय कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन वाढवण्यासाठी पाऊल उचलणार आहे. यामुळे केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. (Salary Hike Under 8th Pay Commission)
केंद्रिय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन सध्या १८००० रुपये आहे. आठव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८००० रुपयांवरुन ५१,४८० रुपये वाढू शकते. आठव्या वेतन आयोगामुळे फिटमेंट फॅक्टरमध्येही मोठी वाढ होईल. फिटमेंट फॅक्टर हे पगार मोजण्यासाठी वापरले जाते. यावेळी किमान पगार आणि पेन्शन १८६ टक्क्यांनी वाढू शकते.
सध्या सातव्या वेतन आयोगानुसार, कर्मचाऱ्यांना मूळ वेतन १८००० रुपये आहे. ६ व्या वेतन आयोगातून ७ वेतन आयोगात ७००० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता आठव्या वेतन आयोगापर्यंत २.८६ फिटमेंट फॅक्टरनंतर मूळ वेतन ५१,४८० रुपये वाढू शकते.
पेन्शनधारकांना फायदा
८ व्या वेतन आयोगाअंतर्गत पेन्शनमध्येही भरघोस वाढ होणार आहे. पेन्शन १८६ टक्के वाढू शकते.७ वा वेतन आयोग हा २०१६ रोजी लागू करण्यात आला होता. त्यानंतर १० वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. आठवा वेतन आयोग हा २०२६ पर्यंत लागू होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.