
केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.केंद्रिय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी वाढणार आहे. सध्या केंद्रिय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८००० रुपये आहे. परंतु ही सॅलरी लवकरच वाढणार आहे. केंद्रिय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी २१४८० रुपये होऊ शकते.
सरकार लवकरच ८वा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत आहे. आठवा वेतन लागू झाल्यानंतर मूळ वेतन आणि पेन्शनमध्ये १८६ टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ होणार आहे.
सरकारने ८वे वेतन आयोग लागू केले तर फिटमेंट फॅक्टरदेखील वाढणार आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. (8th Pay Commission Basic Salary Hike)
सध्या केंद्रिय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाअंतर्गत १८००० रुपये बेसिक सॅलरी मिळते. तर नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर किमान वेतनात २३८४० रुपयांनी वाढ होणार आहे. १ कोटी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात चांगली भेट मिळणार आहे.
पगारासोबतच पेन्शनमध्ये १८६ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पेन्शन ९००० रुपये आहे ते वाढून २५,७४० रुपये होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.परंतु याबाबत डिसेंबर महिन्याल बैठक होण्याची शक्यता आहे.(8th Pay Commission)
वेतन आयोग
दर १० वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. २०१६ मध्ये ७वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. वेतन आयोग लागू करण्यापूर्वी एक समिती तयार केली जाते. या समितीच्या निर्णयानंतर वेतन आयोग लागू केला जातो. आता वेतन आयोगासाठी समिती तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर २०२६ मध्ये ८वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.