Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

MNS party status : विधानसभा निवडणुकीनंतर मनसेची मान्यता राहणार का? राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, काय लागणार निकाल?
Raj Thackeray
Raj ThackeraySaam tv
Published On

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला आज होणार आहे. महायुती की मविआ कोण सत्तेत येणार? याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल. पण त्या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. फक्त उमेदवारचं नाही तर या राज ठाकरेंच्या मनसेची धाकधूकही वाढली आहे. कारण, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तीन आमदार निवडून आले नाहीत, तर अधिकृत पक्षाची मान्यता धोक्यात येईल.

राज ठाकरे यांनी २००७ मध्ये शिवसेनेपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा करत आपल्या स्वत:च्या पक्षाची स्थापना केली. २००९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची राज ठाकरेंनी स्थापना केली. पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरेंना महाराष्ट्राने भरभरुन प्रतिसाद दिला. पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेचे १३ आमदार निवडून आले. पण त्यानंतर मात्र मनसेची गती मंदावली. २०१९ च्या निवडणुकीत मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला. यंदाच्या निवडणुकीत तीन आमदार आणि तीन टक्के मतं मनसेला मिळवावीच लागतील, अन्यथा पक्षाची अधिकृत मान्यता धोक्यात येईल.

Raj Thackeray
Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

राज ठाकरेंसाठी २०२४ विधानसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. कारण, मनसेच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकलाय. निवडणूक आयोगाने दिलेली मान्यता टिकवण्यासाठी मनसेला यंदाच्या निवडणुकीत किमान तीन आमदार आणि तीन टक्के मतांची गरज आहे.

Raj Thackeray
Maharashtra Exit Poll : आपला भिडू बच्चू कडू... अचलपूरमधून बच्चू कडू पाचव्यांदा आमदार होणार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेने १२३ जागा लढवल्या आहेत. अधिकृत मान्यता टिकवण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेला तीन आमदार आणि तीन टक्के मतांची गरज आहे. अथवा एकूण मतदानाच्या आठ टक्के मते मनसेला मिळवावी लागतील, अन्यथा अधिकृत मान्यता धोक्यात येईल, अशी माहिती आयोगाने दिली.

आयोगाचे निकष काय -

राज्यातील एकूण मतदार ९.७० कोटी इतके आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीला ६.७८ कोटी लोकांनी मतदान केले. राज ठाकरेंच्या मनसेला आयोगाची मान्यता टिकवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. मनसेचे तीन आमदार आणि एकूण मतदानाच्या तीन टक्के मतं मिळवावी लागलीत. जर सहा टक्के मते मिळाली, तर दोन आमदार यावेच लागतील. जर एकही आमदार निवडून आला नाही तर ८ टक्के मते मिळवावी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com