8TH PAY COMMISSION saam tv
बिझनेस

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! नवीन वर्षात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी काय बदलणार?

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग २०२६ मध्ये लागू होणार आहे. दरम्यान, नवीन वर्षात कर्मचाऱ्यांसाठी काय बदलणार हे जाणून घ्या.

Siddhi Hande

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

नवीन वर्षात लागू होणार नवीन वेतन आयोग

नवीन वर्षात कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी काय बदलणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग २०२६ पासून लागू होणार आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. दरम्यान हा वेतन आयोग जरी जानेवारी २०२६ पासून लागू होणार असला तरी त्याअंतर्गत येणारी पगारवाढ येण्यास उशिर होणार आहे.

आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शिफारसी सादर करणार आहे. या शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी दिला आहे. या शिफारसी सादर झाल्यानंतर केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.

केंद्र सरकारने २८ ऑक्टोबर २०२५ मध्ये आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली. त्यानंतर कामाला सुरुवात झाली. दर १० वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. सातवा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू झाला होता. त्यानंतर आता आठवा वेतन आयोग २०२६ मध्ये लागू होणार आहे.

आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांना कधीपासून मिळणार पगार? (8th Pay Commission Salary Date)

आठवा वेतन आयोगासाठी शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यामुळे हा रिपोर्ट २०२७ मध्ये येईल. त्यानंतर २०२८ मध्ये कर्मचाऱ्यांचा पगार वाढला जाऊ शकतो. या नवीन वेतन योगाचा फायदा ५० लाख केंद्रीय कर्मचारी तर ६९ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. यामुळे सॅलरी, पगार आणि इतर भत्तेदेखील वाढणार आहे.

पगार कितीने वाढणार? (8th Pay Commission salary Hike)

आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. फिटमेंट फॅक्टर २.५ ते ३.० होण्याची शक्यता आहे. यामुळे बेसिक सॅलरी २० ते ३५ टक्के वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत भाजपला कडू का नकोत? प्रहारच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध?

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

Bengaluru Rain: बेंगळूरमध्ये पावसाचा हाहाकार; हॉस्पिटलजवळ भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पडद्यामागं जोरदार हालचाली

SCROLL FOR NEXT