8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

8th Pay Commission Implementation Date: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू होण्यास अजून वेळ लागू शकतो.

Siddhi Hande

केंद्र सरकारचे कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न विचारत आहेत. ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना या वेतन आयोगाचा फायदा होणार आहेत. दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू होण्यास अजून काही वेळ लागू शकतो. आठव्या वेतन आयोगाची समिती स्थापन होण्याची वाट पाहत आहेत. ही समिती स्थापन झाल्यानंतर आठव्या वेतन आयोगाबाबत निर्णय घेतला जाईल.

आठव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार आणि भत्त्यांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली होती. मात्र, अद्याप समिती झालेली नाही. समितीआधी टर्म्स आणि रेफरंस जारी केले जातात. त्याचीही घोषणा झालेली नाही.

८वा वेतन आयोग कधी लागू होणार? (When Will 8th Pay Commission Implemented)

दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जाते. ७व्या वेतन आयोगाची घोषणा २०१४ मध्ये झाली होती. त्यानंतर २०१६ मध्ये हा वेतन आयोग लागू झाला. यामध्ये कर्मचाऱ्यांना पगार २३ टक्क्यांनी वाढला होता. त्यामुळे यंदा आठव्या वेतन आयोगात वेतनात किती वाढ होणार असा प्रश्न विचारला जात आहे.

यानुसार वेतन आयोग लागू होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागतो. दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू होण्यास अजून बराच वेळ लागू शकतो. वेतन आयोगाबाबत कोणतीही प्रोसेस सुरु झालेली नाही. मिडिया रिपोर्टनुसार, आठवावोतन आयोग २०२८ मध्ये लागू होऊ शकतो. कोटक Institutional Equities ने सांगितले की, वेतन आयोग २०२६च्या शेवटी किंवा २०२७ च्या सुरुवातीला लागू होऊ शकतो.

पगार कितीने वाढणार? (8th Pay Commission Salary Hike)

वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. दरम्यान, यंदा फिटमेंट फॅक्टर १.८ ने वाढू शकतो. जर आठव्या वेतन आयोगात १.८ ने वाढ झाली तर बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ३०,००० रुपये होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT