Wardha Police : शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले पोलिसदादा; वर्ध्यातील १८०० पोलीस देणार एका दिवसाचे वेतन

wardha News : संस्था, संघटना मदतीसाठी पुढे येत आपली मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करत आहेत. अशात वर्धा पोलीस दल देखील पुढे आले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार आहे
Wardha Police
Wardha PoliceSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: पोलिस म्हटलं की शिस्त, धाक आणि कठोरपणा. पण आज हीच खाकी वर्दी माणुसकीच्या रंगात दिसत आहे. कारण वर्धा जिल्ह्यातील तब्बल १८०० पोलिस कर्मचारी आणी अधिकारी अतिवृष्टीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. जिल्ह्यातील पोलीस दलातील कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत देणार आहेत. 

राज्यात यंदा झालेला मुसळधार पाऊस व सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतीचा ओघ सुरु आहे. अनेक संस्था, संघटना मदतीसाठी पुढे येत आपली मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करत आहेत. अशात वर्धा पोलीस दल देखील पुढे आले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार आहे. 

Wardha Police
Monkey Pox : राज्यात मंकी पॉक्सचा शिरकाव; धुळ्यात आढळला पहिला रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

पोलीस दलाचा पुढाकार 

वर्ध्यातील सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपला एक दिवसाचा वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. नदी- नाले तुडुंब भरल्याने शेतं पाण्याखाली गेली होती. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने देखील पुढाकार घेत माणुसकीचा संदेश दिला आहे. 

Wardha Police
Nagpur : मतदार यादीत एकाच घरात २०० मतदारांची नोंद; वानाडोंगरी नगरपरिषदच्या यादीत घोळ असल्याचा आरोप

दरम्यान यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयातून सूचना प्राप्त होताच पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. बैठक घेऊन सर्वांच्या सहमतीने ऑक्टोबर महिन्यातील एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. अर्थात जिल्हा पोलीस दलातील १८०० पोलीस कर्मचारी एक दिवसाचा पगार देणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com