Monkey Pox : राज्यात मंकी पॉक्सचा शिरकाव; धुळ्यात आढळला पहिला रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

Dhule News : सौदी अरेबिया येथून २ ऑक्टोबरला धुळ्यात आला असता या रुग्णास त्रास जाणवू लागल्याने दुसऱ्याच दिवशी धुळ्याच्या शासकीय हिरे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले यानंतर रक्ताचे नमुने तपासणी करण्यात आले
Monkey Pox
Monkey PoxSaam tv
Published On

धुळे : कोरोना नंतर जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. धुळ्याच्या हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या रुग्णाचे दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सदर रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आली आहे. 

धुळ्यात आढळून आलेला सदर रुग्ण पुरुष असून साधारण ४५ वयोगटातील हा रुग्ण आहे. सदर रुग्ण मागील चार वर्षांपासून सौदी अरेबिया येथे राहत होता. तेथून २ ऑक्टोबरला धुळ्यात आला होता. यानंतर या रुग्णास त्रास जाणवू लागल्याने दुसऱ्याच दिवशी धुळ्याच्या शासकीय हिरे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मंकी पॉक्सची लक्षण जाणवत असल्याने तपासणी करण्यात आली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भारतात आतापर्यंत याचे 35 रुग्ण आढळले आहेत, तर महाराष्ट्रातील ही पहिलीच केस आहे,

Monkey Pox
Jalgaon : हद्दच झाली! दागिन्यांसाठी स्मशानभूमीतून अस्थी चोरी; जळगावात आठवडाभरातील दुसऱ्या घटनेने खळबळ

दुसरा अहवालही पॉझिटिव्ह 

उपचार सुरु असताना या रुग्णाने डॉक्टरांनामंकी पॉक्सची लक्षणे दिसून आल्याने मनपाच्या पथकाने सदर रुग्णाच्या रक्ताचे नमूने घेतले. हे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर रुग्णाचा मंकी पॉक्सचाअहवाल पॉझिटीव्ह आला. यानंतर पुन्हा एकदा रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविले असता दुसरा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. 

Monkey Pox
Nagpur : मतदार यादीत एकाच घरात २०० मतदारांची नोंद; वानाडोंगरी नगरपरिषदच्या यादीत घोळ असल्याचा आरोप

आरोग्य यंत्रणा अलर्ट 
रुग्णाचा दुसरा अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर रुग्णाला विलगीकरण कक्षामध्ये हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर सदर रुग्णाच्या कुटुंबीयांची तपासणी केली असता कुटुंबीयांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची शोध घेण्यात येत आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com