Jalgaon : हद्दच झाली! दागिन्यांसाठी स्मशानभूमीतून अस्थी चोरी; जळगावात आठवडाभरातील दुसऱ्या घटनेने खळबळ

Jalgaon News : अंत्यसंस्कार केल्यानंतर दोन दिवसांनी अस्थी गोळा करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना राखेसह अस्थी गायब असल्याचे दिसून आले. इतकेच नाही तर याठिकाणी पंचपक्वान्न असलेले पान ठेवलेले होते
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर कुटुंबीय, नातलग निघून जातात. मात्र यानंतर प्रेताच्या राखेत असलेले दागिने चोरीसाठी थेट अस्थी चोरीला जात असल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे. एकाच आठवड्यात सलग दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली असून दागिन्यांसाठी अस्थी चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

जळगाव शहरातील मेहरून स्मशानभूमीत आठवड्यातील काही दिवसांपूर्वी छबाबाई पाटील या महिलेच्या अंत्यसंस्कार नंतर तिच्या अंगावरील दोन तोळा दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार घडला होता. अस्थी घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात आला होता. या घटनेला एक आठवडा देखील अद्याप पूर्ण झाला नसताना, तशाच पद्धतीने चोरट्यांनी शिवाजीनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जिजाबाई पाटील यांच्या नातेवाईकांना आला आहे. 

Jalgaon News
Beed Crime : भावकीत शेत जमिनीतून वाद; पुतण्यांच्या मारहाणीत काकाचा मृत्यू, तिघां विरोधात गुन्हा दाखल

शिवाजीनगर स्मशानभूमीतून अस्थी गायब 

जळगाव शहरात खडके चाळीत राहणाऱ्या जिजाबाई पाटील यांच्या मृत्यूनंतर शिवाजी नगर येथील स्मशानभूमीत शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान आज सकाळच्या सुमारास त्यांचे नातेवाईक अस्थी घेण्यासाठी आले असता त्यांना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणी डोक्याच्या आणि पायाच्या भागातील राखेसह असती गायब झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे खळबळ उडाली आहे. 

Jalgaon News
Sambhajinagar : भररस्त्यात एलपीजी टँकर थांबवून गॅस सिलिंडर रिफिलिंग; वाळूज परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस

चार ग्रॅम सोन्याचे दागिने 

जिजाबाई पाटील यांच्या अंगावरील चार ग्राम सोन्याचे दागिने देखील यावेळी गायब झाल्याचं लक्षात आल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. चोरट्यांनी दागिने लंपास केले असले तरी मयताच्या भीतीने अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी पंचपक्वान्न असलेले भोजनाचे पान ठेवल्याचे आढळले आहे. सगळ्या प्रकारात आता मनपा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाच्या बाबत नागरिकांच्या मनात संताप असल्याच पाहायला मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com