8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! कधीपर्यंत लागू होणार? वाचा सविस्तर

8th Pay Commission Implementation Date: आठवा वेतन आयोग कधीपर्यंत लागू होणार असा प्रश्न सरकारी कर्मचारी विचारत आहे. दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू होण्यास किती वेळ लागणार याबाबत माहिती समोर आली आहे.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?

आठवा वेतन आयोग लागू होण्यास किती वेळ लागणार?

केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. यानंतर आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न कर्मचारी विचारत आहे. आठवा वेतन आयोग लागू होण्यास अजून खूप वेळ लागू शकतो. आठव्या वेतन आयोगाची समिती अद्याप स्थापन झालेली नाही. समिती स्थापन झाल्यानंतर ८व्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार याचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर हा लागू केला जाईल.

8th Pay Commission
Government Scheme: या सरकारी योजनेत महिलांना मिळतात २१०० रुपये; अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

दरम्यान, अजूनपर्यंत आठव्या वेतन आयोगासाठी समितीच स्थापन झालेली नाही. समिती स्थापन करण्याची प्रोसेस व्हायला अजून वेळ लागेल. दरम्यान, टर्म ऑफ रेफरन्सदेखील ठरवण्यात आलेले नाही. त्याच्या आधारावर आठवा वेतन आयोग लागू केला जातो.

या टर्म ऑफ रेफरन्समध्ये आठवा वेतन आयोग कोणत्या मुद्द्यांवर लागू केला जाणार याबाबत माहिती असते. जसे की, पेन्शन, भत्ता आणि वेतनामधील बदल याबाबत माहिती दिली जाते.दरम्यान, याबाबतचेही काम अजून सुरु झाले नाही.

आठवा वेतन आयोग लागू होण्यास किती वेळ लागणार? (8th Pay Commission Implementation Date)

नवीन वेतन आयोग लागू होण्यास २ ते ३ वर्षांचा कालावधी लागू शकतो. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ७ वा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रोसेसलाही २-३ वर्षांचा कालावधी लागला होता. २०१४ मध्ये सातव्या वेतन आयोगाची घोषणा झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये याबाबत रिपोर्ट सरकारला देण्यात आला. यानंतर २०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला. यामुळे आता हा नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्यासही २-३ वर्षांचा कालावधी लागू शकतो.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! आता ५१००० नाही तर ३०००० होणार बेसिक सॅलरी; नवीन रिपोर्ट समोर

कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नाही

आठवा वेतन आयोग लागू होण्यास अजून वेळ लागू शकतो. दरम्यान, याचा एरियर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही.

8th Pay Commission
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाची बातमी! शिपाई ते अधिकारी, कोणाचा पगार कितीने वाढणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com