8th Pay Commission google
बिझनेस

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांची चांदी होणार! हेल्परपासून सीनियरपर्यंत, कोणाची किती वाढणार सॅलेरी? समजून घ्या गणित

Railway Employee Salary Big Hike: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर खूप महत्वाचा असतो. त्यावर तुमची पगारवाढ अवलंबून असते. त्यामुळे रेल्वे कर्मतचाऱ्यांनी बेसिक सॅलरी आणि फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली आहे.

Sakshi Sunil Jadhav

आठव्या वेतन आयोगाबाबत सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे यामध्ये बेसिक सॅलेरी, फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्त्याच्या मागण्या केल्या जात आहेत. जर या मागण्या स्विकारल्या तर हेल्परपासून सीनियर पदापर्यंत सगळ्यांचीच चांदी होणार आहे.

बेसिक सॅलेरीत वाढ करण्याची मागणी

सरकारी कर्मचाऱ्यांसोबत आता रेल्वे कर्मचाऱ्यांनीही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये त्यांची बेसिक सॅलेरी वाढवून ५२,००० रुपये इतकी करावी अशी मागणी केली आहे. यासोबत फिटमेंट फॅक्टर ४.३८ पर्यंत वाढवणे, घरभाडे भत्त्यात (HRA) वाढ करणे आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली आहे. कारण पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते.

कोणत्या कर्मचाऱ्यांची चांदी होणार?

जेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या मागण्या स्वीकारल्या जातील. तेव्हा आठवा वेतन आयोगातील कर्मचारी म्हणजेच ज्युनियर इंजिनिअर, सिनियर सेक्शन इंजिनिअर, असिस्टंट मॅनेजर आणि इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांची चांदी होऊ शकते. तसेच ही मागणी इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर्स असोसिएशनने (IRTSA) केली आहे.

कोणाचा किती फिटमेंट फॅक्टर असेल?

इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर्स असोसिएशन संघटनेने वेगवेगळ्या विभागानुसार वेगवेगळा फिटमेंट फॅक्टर असेल असं सांगितलं आहे. L-१ पासून L-५ साठी २.९२, L-६ पासून ते L-८ साठी ३.५०, L-९ पासून ते L-१२ साठी ३.८०, L-12 पासून ते L-१६ साठी ४.०९ आणि L-१७ पासून L-१८ पर्यंत ४.३८ फिटमेंट फॅक्टर ठेवला जाईल.

सॅलेरीचे गणित समजून घ्या

जेव्हा मागण्या पुर्ण होतील, तेव्हा तुमची बेसिक सॅलेरी ही ५२,००० असेल तर कमाल सॅलेरी ही ९.८५ लाखांपर्यंत पोहोचू शकते. रेल्वे कर्मचारी संघटनेने घरभाड्यात (HRA) ४० टक्क्यांपर्यंत वाढ होईल असा अंदाज सांगितला आहे. संघटनेच्या मते, प्रमुख शहरांमध्ये राहण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे घरभाड्यात वाढ करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध 'मातोश्री' हॉटेलवर FDAचा दणका; बिर्याणीत झुरळ निघाल्यानंतर कारवाई

IND W vs PAK W: भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव; टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा 'श्रीगणेशा'

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर तणाव वाढला; भारतीय खलाशी असलेल्या जहाजावर हल्ला

Parbhani: पुतणींचा आरडाओरडा ऐकताच काकीनं गोदावरी नदीत घेतली उडी; चुलतीसह २ सख्खा बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू

प्रसिद्ध रीलस्टारचा अपघाती मृत्यू; रस्त्यावरील खडी ठरली जीवघेणी, अपघाताचा सीसीटीव्ही आला समोर

SCROLL FOR NEXT