Union Budget 2024: Important Things To Know About Budget Saam Tv
Budget

Budget 2024: पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला? जाणून घ्या अर्थसंकल्पाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी

Important Things To Know About Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये आगामी आर्थिक वर्षासाठी वित्तीय डेटा आणि कर योजनांचा समावेश आहे. 2024 च्या निवडणुकीपूर्वी सादर होणारा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Important Things To Know About Union Budget

लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करणार आहेत. भारताचा पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी 7 एप्रिल 1860 रोजी सादर केला होता. ते स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि ईस्ट इंडिया कंपनीचे राजकारणी होते. त्यांच्यानंतर आरके षण्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता.  (latest budget update)

इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या. केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट दोन्ही 2017 पर्यंत स्वतंत्रपणे सादर केले जात होते. 2017 मध्ये रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण

विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmla Sitharaman) यांच्या नावावर सर्वाधिक प्रदीर्घ भाषणाचा विक्रम आहे. 1 फेब्रुवारी 2020 रोजी 2020-21 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी दोन तास बेचाळीस मिनीटे भाषण केलं होतं.

सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण

1977 रोजी अर्थमंत्री हिरुभाई मुळजीभाई पटेल यांनी सर्वात लहान अर्थसंकल्पीय (Budget 2024) भाषण केलं होतं. ते फक्त 800 शब्द बोलले होते. माजी पंतप्रधान मोराराजीदेसाई यांच्या नावावर सर्वाधिक सादरीकरणाचा विक्रम आहे. देशाच्या इतिहासातील अर्थमंत्री म्हणून त्यांनी 10 सादर केले होते. त्यानंतर पी चिदंबरम (9), प्रणव मुखर्जी (8), यशवंत सिन्हा (8), मनमोहन सिंग (8) यांचा क्रमांक लागतो.

अर्थसंकल्पाची वेळ

ब्रिटिशकालीन पद्धतीनुसार 1999 पर्यंत अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाचा दिवशी संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात होता. 1999 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्पाच्या वेळेत बदल केला. त्यांनी वेळ बदलून सकाळी ११ वाजता सादरीकरण करण्यास सुरूवात (Budget 2024) केला. अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी 2017 पासुन महिन्याच्या पहिल्याच दिवशी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली.

केंद्रीय अर्थसंकल्प 1955 पर्यंत इंग्रजीत सादर केला जात होता. परंतु काँग्रेसच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने अखेर अर्थसंकल्पाची कागदपत्रे हिंदी आणि दोन्ही भाषेत छापण्याचा निर्णय घेतला. कोरोना महामारीमुळे 2021-22 चे बजेट पूर्णपणे डिजीटल करण्यात आलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT