अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील विशेष घोषणेपासून, लोकांचं लक्ष त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या वेळेकडे देखील होतं. कारण, निर्मला सीतारामन यांच्या नावावर आतापर्यंतचं सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण केल्याचा विक्रम आहे. (Latest Marathi News)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020 मधील सर्वात प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण (Nirmala Sitharaman Budget Speech) दिलं होते. त्यांनी लोकसभेत 2.42 तासांचे अर्थसंकल्पीय भाषण केलं होत. मात्र, त्यानंतर त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाची वेळ कमी होत गेली. आजही त्यांना 2020 चा विक्रम मोडता आलेला नाही. निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्प 2024 मधील त्यांचं आजचं भाषण 60 मिनिटांत पूर्ण केलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अर्थसंकल्पीय भाषणाची वेळ
गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला होता. या सर्वसाधारण अर्थसंकल्पीय भाषणाची वेळ 1 तास 25 मिनिटे (Nirmala Sitharaman Budget Speech Time) होती. 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांना 1 तास 31 मिनिटे लागली. याशिवाय, वर्ष 2019 मध्ये त्यांनी 2 तास 17 मिनिटांत भाषण पूर्ण केलं होतं. निर्मला सीतारामन यांनी 2020 मधील 2 तास 42 मिनिटांचे सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण वाचून माजी अर्थमंत्री जसवंत सिंह यांचा 2003 चा विक्रम मोडला होता.
जसवंत सिंह यांचा रेकॉर्ड मोडला
सीतारामन यांच्या आधी जसवंत सिंह यांच्या नावावर सर्वाधिक प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण (Budget Speech) देण्याचा विक्रम होता. 2003 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री जसवंत सिंह यांनी 2 तास 13 मिनिटांचे भाषण केलं होतं. जसवंत सिंह यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना हा विक्रम केला होता. तो 2020 मध्ये निर्मला सीतारामन यांनी मोडला होता.
सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला
सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. आतापर्यंत त्यांनी अर्थमंत्री म्हणून 10 वेळा म्हणजे सर्वाधिक वेळा भारताचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला आहे. यामध्ये आठ पूर्ण सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि दोन अंतरिम अर्थसंकल्पांचा समावेश आहे.
मोरारजी देसाई यांच्यानंतर सर्वाधिक बजेट पी. चिदंबरम यांच्या नावावर आहे. ते यूपीए सरकारमध्ये नऊ वेळा अर्थमंत्री (Budget 2024) होते. याशिवाय प्रणव मुखर्जी आणि यशवंत सिन्हा यांनी प्रत्येकी आठ वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.