'आई-बाबा, मला माफ करा..'; NEETच्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमध्ये लिहिलं कारण

Kanpur NEET Coaching Student Ends Life: कानपूरमधून धक्कादायक माहिती उघड. NEET परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल.
Kanpur NEET Coaching Student Ends Life
Kanpur NEET Coaching Student Ends LifeSaam
Published On
Summary
  • NEET एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आयु्ष्य संपवलं.

  • गळफास लावून आयुष्याचा दोर कापला.

  • मृत्यूपूर्वी सुसाई़ड नोट लिहिली.

आजकाल लोक आयुष्यापासून इतक्या लवकर हार मानत आहेत की, त्यांना स्वत:चा आयुष्य संपवणं सोपं वाटत आहे. कानपूरमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. NEETची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. त्यानं वसतिगृहात लुंगीनं गळफास लावून आयुष्याचा दोर कापला. त्याच्या मृतदेहाजवळ दोन पानांची सुसाईड नोट सापडली आहे. विद्यार्थ्याने ही चिठ्ठी त्याच्या पालकांना उद्देशून लिहिली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मोहम्मद आन (वय वर्ष २१) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो रामपूर येथील भंवरका परिसरातील रहिवासी होता. तीन दिवसांपूर्वी तो रावतपूर येथील हितकारी नगर वसतिगृहात राहायला गेला होता. तो NEET परिक्षेची तयारी करण्यासाठी तिथेच राहत होता. इमदाद हसनही त्याच्यासोबत खोलीत राहत होता.

Kanpur NEET Coaching Student Ends Life
भाजपात जोरदार इनकमिंग; बड्या नेत्याची पक्षात एन्ट्री, ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही सोडली साथ

हसनने मोहम्मदला शुक्रवारी दुपारी १२ वाजता प्रार्थनेला जाण्यास सांगितले, तेव्हा त्यानं नकार दिला. हसन प्रार्थनेसाठी गेला. परतल्यानंतर दरवाज्याला कडी होती. हसनने फोन केला पण मोहम्मदने उचलला नाही. नंतर हसनने जाळीतून डोकावून पाहिले. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. त्यानं याबाबत माहिती पोलिसांना दिली.

Kanpur NEET Coaching Student Ends Life
भयंकर! मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला; तिघे गंभीर जखमी, VIDEO व्हायरल

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान, पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. 'आई - बाबा मी खूप तणावाखाली आहे. मी तुमचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. मी आयुष्य संपवतोय. या सगळ्यासाठी मी जबाबदार आहे. माझे कुटुंब आनंदित राहो', असं त्यानं सुसाईट नोटमध्ये लिहिलंय. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com