Shocking: मांडीवरून हात फिरवला, नंतर टीशर्टमध्ये हात घातला; धावत्या बसमध्ये तरुणीसोबत भयंकर घडलं, पाहा VIDEO
Summary -
केरळमधील बसमध्ये प्रवास करताना तरुणीशी गैरवर्तन
तरुणीने नराधमाचा व्हिडिओ काढत सोशल मीडियावर शेअर केला
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
तरुणीने नराधमाला चोप दिला
नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला
केरळमध्ये धावत्या बसमध्ये तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने तरुणीच्या मांडीवरून हात फिरवला नंतर तिच्या टीशर्टमध्ये हात टाकत छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या तरुणीने स्वत: आपल्या मोबाइलमध्ये या व्यक्तीच्या घाणेरड्या कृत्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर तिने या व्यक्तीला चोप दिला. या घटनेचा संतापजनक व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक तरुणी बसमधून प्रवास करत आहे. या तरुणीच्या शेजारी बसलेली व्यक्ती तिला सतत स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. ही व्यक्ती बॅगच्या खाली हात लपवत आधी तरुणीच्या मांडीला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करतो. तरुणी काहीच करत नसल्यामुळे त्याची हिंमत वाढते त्यानंतर तो तिच्या टीशर्टमध्ये हात घालून छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. ही संपूर्ण घटना पीडित तरुणीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. तरुणीने या व्यक्तीला थांबवले आणि त्याच्या तोंडात दोन चार चापट मारल्या. त्यानंतर बसचा कंडक्टर तरुणीच्या मदतीला येतो.
तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर ही व्यक्ती घाबरतो. त्यानंतर तो सीटवरून उठून उभा राहतो. कंडक्टर त्याला जाब विचारताना दिसतो. बसमधील सर्वजण या व्यक्तीकडे बघतात. तरुणीने या व्यक्तीच्या घाणेरड्या कृत्याचा व्हिडीओ काढत तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नाही. पण या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी तरुणीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. 'आरोपीला ताबडतोब अटक करा.', अशी मागणी एका नेटकऱ्याने केली आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने सांगितले की, 'तरुणीने खूपच चांगले काम केले.' नेटकरी सध्या या आरोपी व्यक्तीवर संताप व्यक्त करत आहेत. 'महिलांना प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. बसमधील एकानेही या व्यक्तीला मारलं नाही. महिलांनी शांत न राहता आरोपीला असाच धडा शिकवला पाहिजे.', असे लिहित एका नेटकऱ्याने राग व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

