Orange Farm Saam tv
ऍग्रो वन

Orange Farm : संत्र्याचे उत्पादन घटले, बदलत्या वातावरणाचा परिणाम; आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड

Washim News : मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. याचा परिणाम पिकांवर होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. पिकांवर रोगराई पसरत आहे. तसेच फळबागांवर देखील याचा परिणाम पाहण्यास मिळत आहे

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : वाशिम जिल्ह्यात वातावरणातील सततच्या बदलामुळे वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. बागांना फळधारणा झाली नव्हती. त्यामुळे शेतकरी आता ही तूट भरून काढण्यासाठी संत्र्यामध्ये आंतरपीक घेत आहेत. यात आता दोन महिन्यात म्हणजे उन्हाळ्यात उत्पादन येण्याच्या अनुषंगाने टरबूज लागवड करण्यात आली आहे. 

मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. याचा परिणाम पिकांवर होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. पिकांवर रोगराई पसरत आहे. तसेच फळबागांवर देखील याचा परिणाम पाहण्यास मिळत आहे. अशाच प्रकारे वाशीम जिल्ह्यात उत्पादन घेण्यात येत असलेल्या संत्री बागांना फटका बसला आहे. यामुळे संत्री उत्पादक संकटात सापडले आहेत. 

दरम्यान वाशीम जिल्ह्यातील बेलखेडा येथील शेतकरी तान्हाजी बबन धांडे यांनी आपल्या दोन एकरात संत्रा बाग आहे. या बागेत आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड केली आहे. दोन ओळी मधील मधल्या रिकाम्या जागेत मल्चिंग पेपर अंथरूण टरबुजाचे पिक घेतल्याने संत्र्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचं धांडे यांनी सांगितले. यातून चांगले उत्पन्न मिळणार असल्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. 

हरभरा पिकांच्या फुलांची गळती
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात वातावरण मोठा बदल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू, हरभरा, तूर यासह फळ बागांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. मेहकर तालुक्याच्या खंडाळा परिसरामध्ये ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकाची फुले गळून पडत आहेत. तर तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. पर्यायाने शेतकऱ्यांना अतिरिक्त फवारणी करावी लागत असल्याने, उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. उत्पन्नात कमालीची घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rules flouted by police: नियम धाब्यावर? एकाच बाईकवरून तीन पोलिसांचा प्रवास; Video Viral होताच लोक संतापले

Ambernath Politics: अंबरनाथच्या राजकारणाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा, भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली, शिंदेंनी डाव टाकला, काय घडलं?

Ind vs NZ playing 11 : न्यूझीलंडविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? रोहित शर्मा, विराट कोहली खेळणार का? कोण बसेल बाकावर?

Maharashtra Live News Update: विक्रोळीत शॉपिंग सेंटरला जवळच्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

निवडणुकीनंतर भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह,राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT