Madhav Bhandari : आरक्षणाची गरज नाही, जिथे जाऊ तिकडे आपलं स्थान निर्माण करू; भाजप नेते माधव भंडारी

Kalyan News : राजकारणामध्ये संख्येचा आणि पैशांचा टक्का बघितला जातो, जो पर्यंत आपलं टक्का वाढवत नाही. आपली रेश वाढवत नाही, तोपर्यंत आपल्याला अपेक्षित असलेले यश मिळत नाही
Madhav Bhandari
Madhav BhandariSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: ब्राम्हण समाजाने कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत ब्राह्मण समाजाचा वाटा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. देशातील उद्योगांच्या उभारणीत ब्राह्मण समाजाचे योगदान खूप मोठं आहे. देशात समाज सुधारण्यासाठीच्या चळवळी झाल्या, त्या उभ्या करणारे बहुतेक ब्राह्मण होते. यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज नाही, आम्ही जिथे जाऊ तिथे स्थान निर्माण करू; असे मत भाजप नेते माधव भंडारी यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा कल्याणमध्ये आयोजित करण्यात आला होता. कल्याण ब्राम्हण सभे तर्फे कल्याणच्या आचार्य अत्रे सभागृहात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किरण सामंत, संजय केळकर, भाजप नेते माधव भंडारी, सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ, परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष आशिष दामले, बोरिवली आमदार संजय उपाध्याय, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 

Madhav Bhandari
Irai Dam : हजारो किलोमीटरचा प्रवास करत इरई धरण परिसरात पक्ष्यांचे आगमन; चंद्रपूर जिल्ह्यातील पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी

यावेळी बोलताना भाजप नेते माधव भंडारी यांनी बोलताना सांगितले, की राजकारणामध्ये संख्येचा आणि पैशांचा टक्का बघितला जातो, जो पर्यंत आपलं टक्का वाढवत नाही. आपली रेश वाढवत नाही, तोपर्यंत आपल्याला अपेक्षित असलेले यश मिळत नाही. आपण आता साडेदहा अकरा टक्क्यांच्या घरात आहोत. गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने आपल्या समाजाचा अपमान करण्याची मोहीम एका विशिष्ट वर्गाकडून सुरू आहे ते पाहिल्यानंतर आता गप्प राहून चालणार नाही. 

Madhav Bhandari
Fraud Case : स्टेट बँकेचे बनावट नियुक्ती पत्र देत साडेबारा लाखात फसवणूक; पोलीस अधिकाऱ्याच्या भावाचे कृत्य

पूर्वीचा इतिहास काय त्या चर्चेला काही अर्थ नाही, हे फक्त आपल्याबद्दलच नाही. मात्र समाजातील कोणत्याही घटकाबद्दल जर असा अपमान, वागणं सहन करावा लागत असेल तर योग्य नाही. आपण ब्राह्मण म्हणून कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. खेड्यापाड्यात राहणाऱ्या एकट्या ब्राह्मणाला संरक्षणाची गरज आहे. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी आपले वजन वापरण्याची गरज. परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी २०० कोटी मागितले पाहिजे, अशी मागणी भंडारी यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष आशिष दामले यांच्याकडे केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com