Wardha Fire Saam tv
ऍग्रो वन

Wardha Fire : शेतातील गोठ्याला आग; शेती साहित्यासह ६ लाखाचे नुकसान

Wardha News : नजीकच्या आवडी गावातील नागरिकांना गोठ्याला आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी शेतकरी मोतीराम गवारले यांना माहिती देण्यात आली

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : शेती साहित्य ठेवण्यासाठी शेतात बांधलेल्या गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे शेती साहित्याचे नुकसान (Wardha) झाले असून यात शेतकऱ्याचे सुमारे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील गवंडी येथील शेतकरी (Farmer) मोतीराम गवारले यांनी शेतात गोठा बांधला आहे. दरम्यान शेतात कोणीही नसताना अचानक गोठ्याला आग लागली. या आगीत गोठ्यातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. मोतीराम गवारले यांच्या शेतातील साहित्य या गोठ्यात ठेवले होते. नजीकच्या आवडी गावातील नागरिकांना गोठ्याला (fire) आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी शेतकरी मोतीराम गवारले यांना माहिती देण्यात आली. 

शेतकरी येईपर्यंत आग सर्वत्र पसरली होती. तसेच गोठ्यात असलेले शेतीपयोगी साहित्य मोटार पंप, स्प्रिंकलर, रासायनिक खते हे शेतीला लागणारे साहित्य जळून खाक झाले. धावडी येथील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकरी गवारले यांच्याकडून खाजगी टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी शेत मालकाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

SCROLL FOR NEXT