Bogus Seeds : बोगस एचटीबीटी बियाणे जप्त; नंदूरबार कृषी विभागाची कारवाई

Nandurbar News : खरीप हंगामासाठी नंदुरबार जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
Bogus Seeds
Bogus SeedsSaam tv

नंदूरबार : गुजरात राज्यातुन महाराष्ट्र राज्यात एचटीबीटी बियाणे आणण्यास बंदी आहे. असे असताना हे बियाणे (Nandurbar) विकण्याचा उद्देशाने येत असल्याच्या माहितीवरून कृषी विभागाने कारवाई करत ३० लाख रुपये किमतीचे बोगस बियाणे जप्त केले आहे. 

Bogus Seeds
Jalgaon Accident : दुचाकी कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

खरीप हंगामासाठी नंदुरबार जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. बोगस बियाणे (Bogus Seeds) विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक तसेच तालुकास्तरावर एक असे सात भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. त्यानुसार १ मे रोजी दुपारी नंदूरबार येथील (Agriculture Department) कृषि विभागाला गुजरात राज्यातून एचटीबीटीची बोगस बियाणे राज्यात खापरमार्गे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचुन खापर नजीक बोगस बियाणे वाहतूक करणारा ट्रक पकडला.

Bogus Seeds
Dhule Fire : लाकडाची वखार, फर्निचर गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

सदरची कारवाई विभागातील सर्वात मोठी व हंगामातील पहिलीच असल्याने बोगस कृषी बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यावेळी पथकाला बोगस एचटीबीटी योध्दा नामक बोगस बियानाचे १ हजार पाकीटे व वाहतूक करणारे वाहन जप्त केले असून एकुण तिस लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच वाहन चालकावर (Akkalkuwa) अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com