Nandurbar Water Crisis: नंदुरबारमध्ये दुष्काळाच्या झळा! एक हंडा पाण्यासाठी वणवण; महिलांना करावी लागतेय २-३ किमी पायपीट

Nandurbar Water Crisis: बोदला गावातील आदिवासी महिलांना पाण्यासाठी डोंगराळ भागातून वाट काढावी लागत आहे. एक हंडा पाण्यासाठी या महिलांना 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
Nandurbar Water Crisis: नंदुरबारमध्ये दुष्काळच्या झळा! एक हंडा पाण्यासाठी वणवण; महिलांना करावी लागतेय २-३ किमी पायपीट
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे,नंदुरबार|ता. २८ एप्रिल २०२४

एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्ग समजल्या जाणाऱ्या बोदला गाव सध्या भीषण पाणीटंचाईच्या सामना करत आहे. बोदला गावातील आदिवासी महिलांना पाण्यासाठी डोंगराळ भागातून वाट काढावी लागत आहे. एक हंडा पाण्यासाठी या महिलांना 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यामधील अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसताना दिसत आहेत. ५०० लोकसंख्या असलेल्या बोदला गावात २५ हून अधिक हातपंप आणि विहीर असून त्या मार्च महिन्यातच आटल्याने या गावकऱ्यांना आता पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गावात असलेला हा एकमेव हातपंप आता ३०० कुटुंबीयांची तहान भागवत आहे.

आपल्या लहान लेकरांना हाताशी घेऊन या आदिवासी महिला एक ते दोन पायपीट करून या हातपंपावर पाणी भरण्यासाठी येतात. मात्र एकमेव असलेल्या प्रमाणात पाणी भरणाऱ्यांची गर्दी होते. जास्त गर्दी झाल्याने त्या ठिकाणी नंबर देखील लावावा लागतो.

Nandurbar Water Crisis: नंदुरबारमध्ये दुष्काळच्या झळा! एक हंडा पाण्यासाठी वणवण; महिलांना करावी लागतेय २-३ किमी पायपीट
Gondia News: अल्पवयीन मुलीचं सिनेस्टाईल अपहरण; सामूहिक अत्याचार करुन हत्या; चौघे पोलिसांच्या ताब्यात

त्यातच जर पंपाचे पाणी आटलं तर ते ४ तास पाण्याची वाट बघत या ठिकाणी थांबव लागत असल्याचं विदारक चित्र हे सातपुड्यात पाहायला मिळत आहे. गावात असलेला हा एकमेव हात पंप जर बंद झाला तर येणारा काळात या गावकऱ्यांना याहून अधिक पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

Nandurbar Water Crisis: नंदुरबारमध्ये दुष्काळच्या झळा! एक हंडा पाण्यासाठी वणवण; महिलांना करावी लागतेय २-३ किमी पायपीट
Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com