- संजय राठाेड / मनाेज जयस्वाल / शुभम देशमुख
यवतमाळ जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे सात तालुक्यात शेतीचे माेठे नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाचा फटका बीजवाई कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. भंडारा जिल्ह्यात देखील दमदार पाऊस झाल्याने भाजीपाल्याचे नुकसानीची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)
वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पाऊस वसाने यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावात साेसाटाच्या वाऱ्यामुळे वीज पुरवठा करणारे खांब पडले. यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला. दरम्यान पावसामुळे गहू, हरभरा आणि फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळीने रात्रीच्या सुमारास झोडपून काढल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
वाशिम जिल्ह्यात बीजवाई कांद्याचं नुकसान
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार परिसरात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बीजवाई कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
वाशिम (washim) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याच्या बियाण्याचं उत्पादन घेतलं जातं. सध्या हे पीक फुलोरा अवस्थेत असताना रविवारी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. त्यातून शेकडो हेक्टर वरील बीजवाई कांद्याचं नुकसान झालं.
शेतकऱ्यांनी हे पीक घेण्यासाठी एकरी किमान 50 ते 60 हजार रुपये खर्च केला आहे. आता हातात काहीच पडणार नसल्याने शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढावले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून सरकारकडून भरीव मदत द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
भंडा-यात दमदार पाऊस
भंडारा (bhandara) जिल्ह्यातही वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान विभागाने भंडारा जिल्ह्यात 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. रविवारी मध्यरात्री जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसला. या पावसाचा फटका भाजीपाला पिकांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.